महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
कानून के हात बडे लंबे होते है… किती लंबे हे आता रिपब्लीक टिव्हीच्या अर्णव गोस्वामीला कळेल… उध्दव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांना एकेरी नावाने संबोधत पत्रकारीतेचा माज दाखविणाऱ्या अर्णव गोस्वामीच्या पत्रकारास मुंबईत मराठी पत्रकारांनी आधी हिसका दाखवला होता. आज मुंबई पोलिसांनी फत्ते शिकस्त केली.
चॅनेलचा टिआरपी वाढावा म्हणून बीएआरसी व हंसा या विश्लेषण व सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांच्या माजी कर्मचाऱ्यांनी रॅकेट चालवले होते. टिव्हीचा टिआरपी वाढावा म्हणून काही लोकांना पैसे देऊन त्यांच्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरू ठेवण्यास सांगितले जात होते. त्यासाठी दिवसाला ४०० ते ५०० रुपये दिले जात होते. त्यामुळे चॅनेलच्या टिआरपीत वाढ तर दिसून आली.
या प्रकरणात दोन मराठी आणि बॉक्स सिनेमा चालकांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी ही माहिती दिली. यापैकी एका व्यक्तीच्या बॅंकेतून तब्बल २० लाख रुपये व लॉकरमधून ८ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
बार्क ही संस्था माध्यमांची टिआरपी मोजते. मात्र हा टिआरपी मोजताना बार्क संस्थेला शंका आली. जो टिव्ही एवढे दर्शक पाहत नसताना दिवस-दिवस कसे पाहतात यासाठी मुंबई पोलिसांकडे टिआरपी घोटाळा असल्याची तक्रार या संस्थेने केली.










