दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंडच्या ग्रामीण भागातील आज कोरोना बाधीत व्यक्तींच्या संपर्कातील नऊ जणांचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका आऱोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.
शनिवारी ( ता.26 ) कोरोना बाधीत रूग्णांच्या संपर्कातील 62 जणांचा कोरोना विषाणुची तपासणी यवत येथील कोवीड सेंटरमध्ये करण्यात आली. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. 62 पैकी 9 व्यक्तींचा अहवाल पॅाझिटिव्ह तर 53 जणांचा आहवाल निगेटिव्ह आला आहे. पाटस, वरवंड, नांदुर, उडंवडी, सहजपुर, नानगाव, जावुजीबुवाचीवाडी या गावांमध्ये प्रत्येकी एक तर खुटबाव येथे दोन अशा नऊ व्यक्तींचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. यामध्ये तीन महिला व सहा पुरूष यांचा समावेश आहे.
रविवारी ( ता.26) केडगाव येथील पत्रा कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सोनवडी येथे तीन जणांचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. पाटस येथील एका ज्येष्ठास कोरोनाची लागण झाल्याचे आज निष्पन्न झाले होते. तसेच कानगाव मध्ये तीन दिवासापुर्वी चार जणांचा खासगी अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. दरम्यान, दौंडच्या पश्चिम भागातील गावांमध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. सहजपुर, नांदुर, बोरीभडक, केडगाव, भांडगाव आदी गावांमधील औद्यागिक वसाहतीमधील कामगार कोरोना बाधीत आढळत आहेत.दौंडच्या पश्चिम भागातील अनेक गावे सध्या कोरोना बाधीत होऊ लागली आहेत.










