वाटा रोजगाराच्या
बारामती : महान्यूज लाईव्ह
केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) आरोग्य खात्यामध्ये पॅरामेडीकल क्षेत्रातील फौजदार, सहायक फौजदारपदासह कॉन्स्टेबल पदापर्यंतच्या ७८९ जागांची भरती होणार आहे, त्याकरीता २० जुलैपासून अर्जास सुरवात झाली असून येत्या २१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी आहे.
सीआरपीएफ च्या दवाखान्यांमध्ये तातडीची ही भरती करण्यात येणार आहे, यामध्ये आरोग्य खात्यामधील फौजदार, हेड कॉन्स्टेबलच्या सफाई कर्मचाऱ्याच्या जागा सर्वाधिक १२१ असून, स्वयंपाकी (कुक) च्या ११६ जागा, क्ष किरण सहायकाच्या ८४ जागा, फिजीओथेरपी, नर्सिंग असिस्टंटच्या ८८ जागा, उपनिरीक्षक पदाच्या (स्टाफ नर्सिंग) १७५ जागा, रेडिओग्राफर (उपनिरीक्षक) पदाच्या ८ जागा, सहायक फौजदार (फार्मासिस्ट) च्या ८४ जागांचा यामध्ये समावेश आहे. याच्या परीक्षा साधारणतः २० डिसेंबर २०२० दरम्यान होतील.
यामध्ये वयाची मर्यादा बहुतेक पदांकरीता २० ते कमाल २५ वर्षे अशीच आहे. ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्या पदाची किमान शैक्षणिक पात्रता ही पॅरामेडीकलमधील त्या-त्या विषयातील पदवी, पदविकेची आहे.
यामध्ये उंचीमध्ये खुला गट, अनुसूचित जाती व ओबीसी प्रवर्गासाठी पुरूषांसाठी १७० सेमी, महिलांसाठी १५७ सेमी तर छातीच्या बाबतीत खुल्या गटासह अनुसूचित जाती व ओबीसी प्रवर्गासाठी ८० सेमी व फुगवून ८५ सेमी असावी.
अनुसूचित जमातीतील उमेदवारासाठी पुरूष प्रवर्गासाठी किमान उंची १६२.५ सेमी, महिलांसाठी १५० सेमी, तर मराठा उमेदवारांसाठी पुरुषांसाठी १६५ सेमी व महिलांसाठी १५५ सेमी आवश्यक आहे. छातीच्या बाबतीत पुरूषांमध्ये अनुसूचित जमातीकरीता ७६ ते ८१ सेमी व मराठा उमेदवारांसाठी ७८ ते ८३ सेमी असावी.
यातील अर्जाची सविस्तर माहिती सीआरपीएफच्या (www.crpf.gov.in) या संकेतस्थळावर असून यातील अर्ज फक्त पोस्टाने व लिखीत स्वरुपातच पाठवायचे आहेत. यामध्ये सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स पॅरामेडीकल स्टाफ एक्झामिनेशन हा विषय पाकिटावर नमूद करून डीआयजीपी, ग्रुप सेंटर, सीआरपीएफ, भोपाळ, बांग्रासिया, तालुका हुजूर जि. भोपाळ, मध्यप्रदेश ४६२०४५ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.











Pharmacist
Kindly check this attachment
Mast
Pharmacist
Ok
Mast
Loveli