दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील केडगाव मधील एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे काल निष्पन्न झाले आहे. आता त्या डॉक्टरच्या कुटुंबातील तीन व्यक्तींचा खासगी लँबचा कोरोना तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.
काल केडगाव व बोरीपार्धीत एका डॉक्टर व रिक्षा चालकास कोरोनाची लागण झाल्याचे काल निष्पन्न झाल्यानंतर आज तीन जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे दौंडच्या ग्रामीण भागातही आता कोरोना वाढताना दिसत आहे.
दरम्यान, केडगाव व बोरीपार्धीतील मुख्य रस्ते ये-जा करण्यास बंद करण्यात आले आहेत. तर सुमारे १९ जणांचे नमुने कोरोना तपासणी साठी पाठवण्यात आले आहेत अशी माहिती डॉ. रासगे यांनी दिली.










