दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील केडगाव मधील आणखी एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.
काल केडगाव व बोरीपार्धीत एका डॉक्टर व रिक्षा चालकास कोरोना ची लागन झाल्याचे काल निष्पन्न झाल्यानंतर आज तीन जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर परत एका डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली असल्याचा खासगी लँबचा अहवाल आज प्राप्त झाला आहे, आज केडगाव बोरीपार्धीत चार जणांना कोरोना अहवाल पाँझिटिव्ह आला आहे, दरम्यान केडगाव व बोरीपार्धीतील सध्या सहा कोरोनाची संख्या झाली आहे, तर या व्यक्तींच्या संपर्कातील १९ जणांचे नमुने शासकीय लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दौंडच्या ग्रामीण भागात सध्या केडगाव बोरीपार्धी कोरोनाचे हॉटस्पॉट बनते की काय अशी स्थिती सध्या निर्माण झाली असून या भागातील नागरीकांची चिंता वाढली आहे; तर प्रशासनाची डोकेदुखी. मात्र नागरीकांनी आता स्वतःहून स्वतःची काळजी व खबरदारी व दक्षता घेण्याची आवश्यकता आहे..











