• Contact us
  • About us
Tuesday, October 20, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सातारा जिल्ह्यातील पहिलीच घटना, वाईच्या नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे लाचखोरीमुळे अपात्र! भाजपला धक्का

Maha News Live by Maha News Live
August 5, 2021
in महिला विश्व, आरोग्य, कामगार जगत, क्राईम डायरी, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, Featured
0
सातारा जिल्ह्यातील पहिलीच घटना, वाईच्या नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे लाचखोरीमुळे अपात्र! भाजपला धक्का

दौलतराव पिसाळ: महान्यूज लाईव्ह

वाईच्या नगराध्यक्षा प्रतिभा सुधीर शिंदे यांच्या लाचखोरीच्या प्रकरणासंदर्भात नगर विकास राज्यमंत्री यांच्या सुनावणीत त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे वाईसह सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. लाचखोरीत थेट नगराध्यक्ष अपात्र ठरण्याची सातारा जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ असून, त्यातही वाईसारख्या सुसंस्कृत व ऐतिहासिक शहरामध्ये अशा प्रकारची घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

प्रतिभा शिंदे यांनी केलेली कृती ही गैरवर्तणूक व अशोभनीय वर्तन या सदरात मोडत असल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 कलम नुसार कार्यवाही करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याच दरम्यान या कृत्यासाठी त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी वाई नगरपरिषदेतील 16 नगरसेवकांनी केली होती.

त्यावरून जिल्हाधिकारी सातारा यांनी या प्रकरणी चौकशी करून शासनास प्रस्ताव पाठविण्यास शासनाने सांगितले होते. त्यानुसार वाईच्या उपविभागीय अधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी या प्रकरणाची चौकशी केली व या चौकशीत डॉ. प्रतिभा शिंदे यांना नगराध्यक्ष पदावर अपात्र ठरवण्याची शिफारस शासनास केली होती. त्याची सुनावणी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या समोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली.

यामध्ये डॉ. प्रतिभा सुधीर शिंदे यांनी लोकसेवक म्हणून काम करत असताना बांधकाम व्यवसायिक अमित जायगुडे यांच्याकडून 14 हजार रुपयांची लाच पती मार्फत स्वीकारली. तेव्हा त्यांच्या पतीसह आणि नगराध्यक्षांना रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. वाई नगरपरिषदेत 20 नगरसेवकांच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे 14 आणि काँग्रेसचे सहा नगरसेवक असून नगराध्यक्ष शिंदे या भाजपच्या चिन्हावर थेट जनतेतून निवड होऊन आल्या होत्या.

या प्रकरणी डॉक्टर प्रतिभा शिंदे यांनी सरकारकडे लेखी आणि तोंडी म्हणणे मांडले होते. यामध्ये त्यांनी आपल्या विरोधात खटला अद्याप न्यायालयात नाही. न्यायालयाने दोषी ठरवण्याआधीच सुरू केलेली ही कारवाई सूडबुद्धीच्या स्वरूपाची असून नैसर्गिक न्याय तत्त्वांच्या विरुद्ध असल्याचे त्यांनी म्हटले.

त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सदस्यांनी जाणीवपूर्वक तथाकथित आंदोलनाची माहिती, बातमी आणि चित्रफिती मोबाईल, टीव्हीवर प्रसारित केल्या आहेत.

यामुळे उलट तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व नगरसेवक अधिनियम कलम 42 नुसार कारवाईस पात्र असून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली होती. मी भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवून निवडून आले आहे आणि वाई नगरपरिषदेच्या विद्यमान सभागृहात बहुमत हे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवकाचे, जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक आमदारांच्या गटाचे आहेत, त्यांचे आहे.

त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला विजय झाल्याने राष्ट्रवादीचे सदस्य आणि स्थानिक नेते अस्वस्थ झाले आहेत. ते माझ्यावर चिडून आहेत त्यातूनच हा प्रकार घडलेला आहे असा आरोप डॉक्टर प्रतिभा शिंदे यांनी केला होता.

दरम्यान या संदर्भात नगर विकास राज्यमंत्री यांच्या अंतिम सुनावणीत डॉक्टर शिंदे या त्यांच्या पतीसमवेत लाच घेताना रंगेहाथ पकडला होत्या, अशा प्रकरणामध्ये संबंधित आणि नैतिकतेच्या कारणास्तव राजीनामा द्यावा अशी नागरिकांची आणि विरोधकांची रास्त मागणी असते, मात्र त्यांनी असा राजीनामा न दिल्याने त्यावेळी जनक्षोभ उसळला होता आणि या कृती निसर्गतः घडली असल्याने सदस्यांकडून काही चुकीचे घडले असे म्हणता येणार नाही. त्यामुळे श्रीमती शिंदे यांची इतर सदस्यांना अपात्र ठरवण्याची विनंती फेटाळण्यात आली. आणि डॉ. प्रतिभा शिंदे यांच्याकडून अशोभनीय वर्तन घडण्याच्या शिफारशीत सहमती दर्शवून त्यांना अपात्र ठरविले.

Next Post
राज्यपाल व महाविकास आघाडी सरकारमधील वाद शिगेला, राज्यपालांच्या दौऱ्याला पालकमंत्री अनुपस्थित राहणार

राज्यपाल व महाविकास आघाडी सरकारमधील वाद शिगेला, राज्यपालांच्या दौऱ्याला पालकमंत्री अनुपस्थित राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group