• Contact us
  • About us
Monday, October 19, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉक्टर व पोलिसांवर हल्ला केल्यास गाठ माझ्याशी : अजितदादांचा इशारा

Maha News Live by Maha News Live
March 26, 2020
in मराठवाडा, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, कोकण, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, विदर्भ
0
डॉक्टर व पोलिसांवर हल्ला केल्यास गाठ माझ्याशी : अजितदादांचा इशारा

लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणं ही सर्वांची जबाबदारी, ‘जीवनावश्यक वस्तू घरपोच-सोसायटीपर्यंत पोहचवण्याचे नियोजन व्हावे’ : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : महान्यूज लाईव्ह

‘कोरोना’ प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

        राज्यात 21 दिवसांचा ‘लॉकडाऊन’, संचारबंदी असली तरी,  दुध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅसचा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बारामती, वाई शहरात अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. शहरात एकाकी राहत असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर राहणारे गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी समाजानं, स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

प्रवासबंदी असताना काही जणांनी दुधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. ही बेपर्वाई चिंताजनक आहे. वसईत पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं. बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. अशा घटनांमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. जनतेनं ‘कोरोना’चं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवावं, पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

मध्यप्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या एका पत्रकार बांधवाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ते माजी मुख्यमंत्री आणि उपस्थित पत्रकारांना संसर्ग झाला असण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांनी ‘ऑनलाईन’ संवाद साधून सुरक्षितता राखावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनातील मुद्दे
  • डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले दुर्दैवी. असे हल्ले सहन केले जाणार नाहीत.
  • ‘कोरोना’ प्रतिबंधक कार्यात अडथळे आणणाऱ्या व डॉक्टर, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करणार
  • पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त व संयम पाळावा.
  • लोक बाजारात, रस्त्यावर ज्या पद्धतीनं गर्दी करत आहेत. सुरक्षित अंतर पाळत नाहीत, यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका वाढत आहे.
  • नागरिकांची खरेदीसाठीचा गर्दी होणे, कोरोना प्रादुर्भावासाठी चिंताजनक आहे.
  • कोरोना प्रतिबंधक अंमलबजावणीसाठी, लष्कराची मदत घ्यायला लागू नये हे पाहणं आपली सर्वांची जबाबदारी.
  • प्रवासबंदी असताना दुधाच्या टँकरमधून प्रवास करण्यासारख्या घटना गंभीर
  • राज्यात संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत
  • दुध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू घरपोच, सोसायटीपर्यंत उपलब्ध करण्याचे नियोजन व्हावे.
  • केंद्रीय वाहतूकमंत्री  नितीन गडकरी यांनी केलेल्या टोलमाफीच्या घोषणेचे स्वागत.
Tags: महाविकासआघाडीउपमुख्यमंत्री अजित पवारकोरोना व्हायरसपोलिस व डॉक्टर
Next Post
राज्यातील मालवाहतुक ट्रकला परवानगी; खाजगी संस्थांद्वारे ‘कम्युनिटी किचन’ सुरू करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील मालवाहतुक ट्रकला परवानगी; खाजगी संस्थांद्वारे ‘कम्युनिटी किचन’ सुरू करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group