मुंबई : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी अत्यंत साधेपणाने गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला. राज्यातल्या जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना, कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये, गर्दी टाळावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
मुंबईतील निवासस्थानी आज ना. अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी अत्यंत साधेपणाने गुढी उभारली. महाराष्ट्रावर मागील काही दिवसांत कोरोना या आजाराचे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी जनतेला शुभेच्छा देताना कोणीही घराबाहेर पडू नये, तसेच रस्त्यावरील गर्दी टाळावी असे आवाहन केले.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक ‘गुढीपाडवा’ या मंगलमय दिनाच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! यंदाचा गुढीपाडवा घरात थांबूनच साजरा करावा. रस्त्यावर उतरू नये, गर्दी टाळा! ‘कोरोना’विरोधात जनजागृती करण्याची, ‘कोरोना’ला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा, असं आवाहन ना. अजित पवार यांनी केले आहे.










