बारामती : महान्यूज लाईव्ह
चीनपाठोपाठ भारतातही कोरोना या जीवघेण्या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातही या आजाराचे काही संशयित रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशातच नोकरीनिमित्त कुटुंबापासून दूर राहणाऱ्या मुलाशी त्याच्या आईने फोनवरून साधलेल्या संवादाची क्लिप आता चांगलीच व्हायरल होत आहे.
माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला, तरी त्याची सर्वाधिक काळजी असते ती म्हणजे जन्मदात्या आईला. त्यामुळंच कोरोनासारखा भयावह आजार पसरत असल्याचं समजल्यानंतर त्या आईनं आपल्या मुलाला, तू काम नाही केलं तरी चालेल, पण घरी ये अशी भावनिक साद घातलीय.. ही क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झालीय.. नेमका काय आहे हा सवांद हे पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या आणि अशा वेगवेगळ्या व्हिडीओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा..










