मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाला १०० दिवस पूर्ण
मुंबई : महान्यूज लाईव्ह
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाला नुकतेच 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज विधानभवन येथे झाले.
मुख्यमंत्री सचिवालय जनसंपर्क कक्ष आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ही पुस्तिका तयार करण्यात आली असून यामध्ये विविध मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील विभागांनी 100 दिवसांत घेतलेल्या निवडक निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. यावेळी ना. छगन भुजबळ, ना. जयंत पाटील, ना. अशोक चव्हाण, ना. अनिल देशमुख, ना. नवाब मलिक, ना. धनंजय मुंडे, ना. नितीन राऊत यांच्यासह माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे आदी यावेळी उपस्थित होते.










