दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे विभाग पदवीधर मतदार संघ व शिक्षक मतदारसंघ याची निवडणुक प्रक्रिया आज दौंड तालुक्यात शांतातमय व मोठ्या उस्ताहामय वातावरणात पार पडली. पाच मतदान केंद्रात पदवीधर मतदार संघा करीता 59.96 टक्के तर शिक्षक मतदार संघा करीता 79.77 टक्के मतदान झाले असल्याची माहिती दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी दिली.
मागील काही दिवसापासून आरोपपत्यारोपांनी निवडणुकीच्या प्रचार सभा जिल्हयात अनेक मु्द्यांनी गाजल्या. आज अखेर पुणे विभागा पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणुकी प्रक्रीया पार पडली. यामुळे सगळ्यांचे लक्ष आता मतमोजणी प्रक्रीयाकडे लागले आहे. आज दौंड तालुक्यात दोन्ही मतदार संघाकरीता पाच मतदान केंद्रात शांतेत व मोठ्या उत्साहमय वातावरणात मतदान पार पडले आहे. तालुक्यात सकाळी आठ वाजल्या पासूनच सर्वच मतदान केंद्रावर मोठ्या उत्सवाचे वातावरण असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
तालुक्यात पदवीधर मतदार संघाकरीता एकुण 59.96 टक्के मतदान झाले. तालुक्यात एकुण 3916 पदवीधर मतदार आहेत. यापैकी 2348 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यामध्ये 1855 पुरूष व 493 महिलांचा समावेश आहे. दौंड 67.86 टक्के,दौंड अ 53.29,दौंड ब 42.74 टक्के, केडगाव 59.14,केडगाव अ 58.55, राहू 69.50 टक्के ,रावणगाव 64.33 , यवत 64.16 या पाच मतदान केंद्रात मतदान प्रक्रीया पार पडली.
तसेच शिक्षक मतदार संघासाठी एकूण 79.77 टक्के मतदान झाले. तालुक्यात एकुणे 1196 पैकी 954 शिक्षक मतदारांनी आपला मतदानांचा हक्क बजावला.
दौंड शहरातील मतदान केंद्रात 83 44 टक्के ,केडगाव 76.02 टक्के ,राहू केंद्रात 85. 58 टक्के, रावणगाव केंद्रात 81.90 टक्के , यवत मतदान केंद्रात 70 टक्के. याप्रमाणे मतदान प्रकीया पार पडली.
आमदार राहुल कुल व त्यांच्या पत्नी कांचन कुल यांनी राहु येथील मतदान केंद्रात जावून आपला मतदानाचा हक्क बजावला. तर माजी आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे,आप्पासाहेब पवार, वासुदेव काळे आदींनी तालुक्यातील मतदान केंदावर जावून मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.











