बारामती : महान्यूज लाईव्ह
पवार कुटुंबातील सदस्य वेळेबाबत आणि कामकाजाबाबत नेहमीच दक्ष असतात याचे अनुभव अनेकदा कार्यकर्त्यांना येतात.. बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानाही आज हा अनुभव आला.. शिरुर, दौंड आणि इंदापूरचा दौरा आटोपून आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अचानक बारामतीतील राष्ट्रवादी भवनला भेट दिली.. इतकेच नाही तर पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या कामकाजाची माहिती घेत एका पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या.. सुप्रियाताईंच्या या भेटीने उपस्थित पदाधिकारीही अवाक झाले..
आज खासदार सुप्रिया सुळे या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिरुर, दौंड आणि इंदापूरच्या दौऱ्यावर होत्या.. इंदापूरमधील शेवटचा कार्यक्रम उरकून रात्री त्या बारामतीकडे परतत असताना त्यांना बारामतीतील राष्ट्रवादी भवन उघडे असल्याचे दिसले.. त्यांनी राष्ट्रवादी भवनात येत उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीबाबत माहिती घेतली…
.यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील कामकाजाबाबत सुचना दिल्या… विशेष म्हणजे त्या ठिकाणी उपस्थित बारामती पंचायत समितीचे उपसभापती प्रदिप धापटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या..
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, लिगल सेलचे अध्यक्ष अँड. रवींद्र माने, तालुका सरचिटणीस बाळासाहेब आगवणे, उद्योजक श्री. सोडमिसे, राष्ट्रवादी विद्यार्थीचे तालुकाध्यक्ष तुषार कोकरे, युवा नेते अतुल खैरे, पलुस तालुका राष्ट्रवादी युवक राष्ट्रवादी अध्यक्ष विनायक महाडिक, सोशल मिडिया अध्यक्ष सुनिल बनसोडे,अभिजीत ढवाण, नितीन सातव, नितीन काकडे, वैभव लोणकर आदी उपस्थित होते..











