बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील सातव वस्तीत विवाहितेने गळफास घेऊन केलेल्या आत्महत्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध बारामती शहर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सागर सुनिल जगताप (वय 31 वर्षे धंदा -व्यवसाय रा उरूळी देवाची ता हवेली जि.पुणे) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून आज शहर पोलिसांनी पती अजित अरूण सातव, सासू मिना अरूण सातव, सासरे ् अरूण सातव ( पुर्ण नाव माहीत नाही ), दिर मनोज अरूण सातव (सर्व रा. सातव वस्ती ता. बारामती जि पुणे) व मामा राजु कोंडे ््( पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
आज (ता. 21) रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. बारामतीतील सातव वस्ती येथील सासरच्या राहत्या घरातील बेडरूम मध्ये सायली अजित सातव (वय 30 वर्षे रा सातव वस्ती ता बारामती जि पुणे) यांनी पती, सासू, सासरे, दिर व पतीचे मामा यांनी लग्नात भांडी व संसारोपयोगी सामान त्यांच्या मागणीप्रमाणे न दिलेच्या कारणावरून तसेच चारित्र्यावर वारंवार संशय घेत वेळोवेळी सामुहिक, मानसिक, शाररीक त्रास देऊन जाचहाट, छळ केल्याने होणा-या सततच्या त्रासाला कंटाळुन गळफास घेऊन आत्महत्या केली. अशी तक्रार सायली यांचे भाऊ जगताप यांनी दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे करीत आहेत.










