महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
लॉकडाऊन च्या काळात कंपनी ची नोकरी गेल्याने शेतात रमलेले दोन भाऊ थोरल्या भावाबरोबर शेतातील विहिरी वरील वीज पंप चालू करण्यासाठी गेले. विजेच्या शॉकने एक भाऊ विहिरीत पडला आणि त्याला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतलेल्या दोन्ही भावांचा देखील विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. रात्रीच्या नऊ वाजता घडलेल्या या घटनेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आयुष्य ढवळून निघाले. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पळस खेडा गावात ही दुर्दैवी घटना घडली.
सुनील अप्पासाहेब जाधव (१९), रामेश्वर अप्पासाहेब जाधव (२७) व ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव या तिघांचा रात्रीच्या विजेने बळी घेतला. भोकरदन तालुक्यातील पळसखेडा या गावातील या तीन सख्ख्या भावाच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात हादरले. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी वीज दिली जाते. या वीजपुरवठ्याच्या काळामध्ये शेतांमध्ये असलेल्या साप, विंचू तसेच अशा चुकीच्या पद्धतीच्या किंवा सदोष वीज पुरवठ्याच्या बाबतीत शेतकऱ्यांनी अनेकदा मागणी करून देखील अगदी लॉकडाऊन च्या काळात देखील शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली गेली नाही.
पळसखेडा गावातील रामेश्वर सुनील व ज्ञानेश्वर तिघे भाऊ रात्रीच्या वेळी एकमेकांना आधार देत वीजपंप चालू करण्यासाठी गेले असता ज्ञानेश्वर यांनी वीज पंप सुरू केला मात्र त्यांना विजेचा धक्का बसला. त्यांना वाचवण्यासाठी इतर दोघांनी देखील विहिरीत उडी घेतली मात्र त्यांना पोहता येत नव्हते त्यामुळे ते दोघे देखील विहिरीत बुडून मृत्यू पावले.










