बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत काल दिवसभरात झालेल्या विविध तपासण्यांमध्ये २५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. अर्थात काल दिवसभरात खासगी, शासकीय प्रयोगशाळांमध्ये आरटीपीसीआर, रॅपी़ड अॅंटिजेन, सीबीनॅट व रॅट तपासण्या ९८ रुग्णांच्या झाल्या आहेत. मागील पाच ते सहा दिवसांपासून बारामतीत २४ ते २६ रुग्ण आढळत आहेत. मात्र तपासण्याही मर्यादित होत आहेत. काल ९८ रुग्णांची तपासणी झाल्यानंतर २५ जण कोरोना रुग्ण आढळले असल्याने कोरोनाचा प्रभाव कमी झालेला नाही. याउलट सध्या सर्दी, खोकल्याचे रुग्ण हे नेहमीची व वातावरण बदलामुळे झालेली सर्दी असल्याचे मानत असल्यानेही रुग्णांची तपासणी करून घेण्याची संख्या घटलेली आहे.
काल शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सांगवी यथील ५० वर्षीय महिला, खंडोबानगर येथील १५ वर्षीय मुलगी, काळेनगर येथील २७ वर्षीय पुरूष, बारामती शहरातील ६० वर्षीय पुरूष, ४० वर्षीय पुरूष, ६६ वर्षीय पुरूष, ६६ वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळले आहेत.
बारामतीतील शासकीय रॅपीड अॅंटिजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सिध्देश्वर गल्ली येथील ६० वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील ३८ वर्षीय पुरूष, घाडगेवस्ती येथील २० वर्षीय महिला, सांगवी येथछील ३१ वर्षीय पुरूष, तांबेनगर येथील २५ वर्षीय महिला, रुई येथील ४० वर्षीय पुरूष, बारामती शहरातील ५३ वर्षीय महिला, ५१ वर्षीय पुरूष, खांडज येथील १९ वर्षीय पुरूष, कसबा येथील ३६ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यातील दोघांचा समावेश
काल बारामतीत तपासलेल्या नमुन्यांमध्ये सणसर येथील बेकरी व्यावसायिक पतीपत्नी यामध्ये ५७ वर्षीय महिला व ६२ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.











