पाटस टोल नाक्यावर महामार्ग वाहतुक पोलीसांकडून वाहनचालकांना मास्क चे वाटप
दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापूर महामार्गावरून प्रवास करणा-या वाहन चालकांना पाटस येथील टोल नाका, वरवंड व चौफुला येथे बारामती फाटा वाहतुक पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी मास्कचे मोफत वाटप केले.
पुणे सोलापूर महामार्गावरून अनेक वाहन चालक हे विनामास्कचे प्रवास करीत आहेत. पोलीसांनी विनामास्क वाहनचालकांवर कारवाईही केली, मात्र अपर पोलीस महासंचालक भुषणकुमार उपाध्याय, पुणे विभागाचे महामार्ग पोलीस अधिक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती फाटा वाहतूक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी पाटस टोल नाक्यावर विनामास्क वाहन चालवताना वाहने अडवून त्यांच्यावर कारवाई ऐवजी त्यांना मास्कचे वाटप केले व समज दिली.
वाहन चालकांनी विनामास्क वाहन चालवू नये. इतर प्रवासी वाहनांमध्ये घेणे शक्यतो टाळावे, प्रथम आरोग्याची व सुरक्षेतीची काळजी घ्यावी, सॅनिटायझर जवळ ठेवावे आदी सूचना दिल्या.
पाटस टोलनाका तसेच वरवंड व चौफुला येथेही वाहनचालकाना मास्कचे वाटप करण्यात आले.
बारामती फाटा महामार्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहाय्यक फौजदार हनुमंत घोळवे, पोलीस हवालदार दिलीप सुतार, पोलीस नाईक सचिन साळुंके आदींनी हा उपक्रम राबविला.











