• Contact us
  • About us
Friday, November 27, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या जमिनींच्या बेकायदेशीर व्यवहारांची चौकशी करा! अन्यथा १ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

mahaanewslive by mahaanewslive
November 27, 2026
in महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पर्यावरण, पुणे, Featured
0
सामाईक ७/१२ ची जमीन खरेदी करताय?व्यवहारांसाठी नवे नियम; ‘क’ प्रत नसेल तर सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक!

काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोनवणे यांचा प्रशासनाला इशारा

दौंड : महान्युज लाईव्ह

पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या जमिनींचे बेकायदेशीर व्यवहार, बनावट कागदपत्रे आणि खोट्या दस्तऐवजांच्या आधारे जमिनी हडपण्याच्या प्रकारांची तातडीने सखोल चौकशी करावी, अशी मागणी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष प्रकाश विष्णू सोनवणे यांनी केली आहे. प्रशासनाने यावर तात्काळ ठोस पावले न उचलल्यास, येत्या १ जानेवारी २०२७ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

​शासनाकडून विविध योजना आणि महसूल विभागामार्फत अनुसूचित जातीतील नागरिकांना मिळालेल्या जमिनींचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, जिल्ह्यात बनावट सह्या, खोटे मुखत्यारपत्र आणि संशयास्पद फेरफार नोंदींच्या आधारे मूळ जमीनधारकांची फसवणूक करून जमिनी बळकावल्या जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामध्ये राज्यभर गाजत असलेल्या पुण्यातील मुंढवा येथील जमीन प्रकरणाची आणि त्याअनुषंगाने चर्चेत असलेल्या ‘जुबेर प्रकरणाची’ कोणती तपास यंत्रणा चौकशी करत आहे व त्यात आत्तापर्यंत काय कारवाई झाली, याची अधिकृत माहिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.

प्रशासनाकडे केलेल्या प्रमुख मागण्या : संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या जमिनींच्या संशयास्पद व्यवहारांची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरीय विशेष चौकशी समिती स्थापन करावी. मुंढवा जमीन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. बेकायदेशीर जमीन हस्तांतरण रद्द करून पीडित मूळ जमीनधारकांना न्याय मिळवून द्यावा. प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा उभारावी आणि जमिनींच्या व्यवहारांची डिजिटल नोंद व नियमित तपासणी करावी. चौकशी समितीचा अहवाल पारदर्शकपणे सार्वजनिक करावा.

​हा लढा कोणत्याही व्यक्ती किंवा समाजाच्या विरोधात नसून, अनुसूचित जातीच्या नागरिकांचे घटनात्मक अधिकार आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आहे. त्यामुळे शासनाने या गंभीर विषयाची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा १ जानेवारी २०२७ रोजी लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असे प्रकाश सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे.

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

    उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

    October 15, 2026
    उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

    उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

    October 15, 2026
    कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

    आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

    October 15, 2026
    दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

    दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

    October 15, 2026
    श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

    श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

    October 15, 2026
    जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

    जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

    October 14, 2026
    पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

    पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

    October 14, 2026
    भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

    भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

    October 14, 2026
    राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

    राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

    October 14, 2026
    श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

    श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

    October 14, 2026
    Load More

    Website Maintained by : Tushar Bhambare

    No Result
    View All Result
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
      • पुणे
      • मुंबई
      • कोकण
      • मराठवाडा
      • विदर्भ
      • उत्तर महाराष्ट्र
      • पश्चिम महाराष्ट्र
    • राजकीय
    • क्राईम डायरी
    • मनोरंजन
    • महिला विश्व
    • व्यक्ती विशेष
    • शेती शिवार
    • लाईव्ह

    Website Maintained by : Tushar Bhambare

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In
    कॉपी करू नका.
    Join WhatsApp Group