• Contact us
  • About us
Friday, November 27, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जलसंधारणाच्या संरचनेची निवड चुकल्यामुळे पाणलोटातील लाखो लिटर पाण्याचे नुकसान होतेय, याची जबाबदारी घेणार का?

mahaanewslive by mahaanewslive
November 27, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, मराठवाडा, महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कोकण, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, पुणे, विदर्भ, Featured
0
जलसंधारणाच्या संरचनेची निवड चुकल्यामुळे पाणलोटातील लाखो लिटर पाण्याचे नुकसान होतेय, याची जबाबदारी घेणार का?

उपेंद्र धोंडे, भूजलशास्रज्ञ पुणे

केवळ प्रसिद्धी आणि लोकप्रियता निकषांवर कामांचे प्रकार ठरवले गेले आणि पाणलोटात तिथला बाष्पीभवन दर, झिरपा दर, अपधाव ईत्यादी स्थितीचा सारासार विचार करूनच जलसंधारण संरचना ठरवायला हवी, परंतु समजा कमी बाष्पीभवन होणाऱ्या संरचनेऐवजी अधिक बाष्पीभवन होणारी संरचना किंवा जास्त झिरपा दर असणाऱ्या संरचनेऐवजी कमी झिरपा दर असणारी संरचना, चुकीचा अपधाव मोजून ठरवलेली संरचना उभारल्यास होणाऱ्या नुकसानीची किंमत कोण मोजणार? या ठिकाणी फक्त बाष्पीभवन एवढ्या एकाच निकषावर विचार करून पाहू.

जलसंधारणाच्या कामांमध्ये आपण किती पाणी अडवले, किती घनमीटर साठवणक्षमता निर्माण केली आणि किती खर्च झाला, याची आकडेवारी अभिमानाने मांडली जाते परंतु त्याच पाण्यापैकी किती पाणी बाष्पीभवनाने वाया गेले, याचा हिशेब क्वचितच मांडला जातो. वास्तविक, एकाच पाणलोट क्षेत्रात कमी बाष्पीभवन होणारी संरचना उभारण्याची संधी असताना अधिक बाष्पीभवन होणारी संरचना निवडली, तर हा केवळ संरचनेच्या प्रकारातील फरक राहत नाही; तर तो लाखो लिटर पाण्याच्या संभाव्य नुकसानीचा आर्थिक आणि पर्यावरणीय प्रश्न बनतो. जो समोर येत नाही कारण तो मोजलाच जात नाही.

हा फरक समजून घेण्यासाठी एक तुलनात्मक उदाहरण पाहूया. समजा, एखाद्या पाणलोट क्षेत्रात १,००० चौ.मी. क्षेत्रावर पाण्याचा साठा निर्माण करण्याची क्षमता आहे. तेथे भूगर्भीय परिस्थिती पुनर्भरणासाठी अनुकूल असल्यामुळे शोषखड्डे किंवा जलतारासारख्या संरचनांमधून पाणी तुलनेने लवकर जमिनीत मुरवणे शक्य आहे. परंतु त्याऐवजी त्याच ठिकाणी मोठ्या उघड्या जलपृष्ठाचा पाझर तलाव किंवा शेततळे तयार केले आणि पाणी दीर्घकाळ साठवून ठेवले, तर बाष्पीभवनामुळे अधिक पाणी गमावण्याची शक्यता निर्माण होते. अगदी याच्याच उलटपक्षी जर पाझर तलावासाठी अनुकूल झिरपा दर असलेली जागा उपलब्ध असूनही जर ज्याला, शोषखड्डा, सिसीटी आणि तत्सम संरचनांवर भर दिला तर काय होईल?

समजा, या उघड्या जलसाठ्यावर प्रतिदिन ५ मिमी बाष्पीभवन होते. तर १,००० चौ.मी. क्षेत्रातून प्रतिदिन ५,००० लिटर पाणी कमी होईल. ३० दिवसांत १.५ लाख लिटर, ६० दिवसांत ३ लाख लिटर आणि ९० दिवसांत ४.५ लाख लिटर पाणी बाष्पीभवनाने कमी होऊ शकते. अशा दहा संरचना असतील तर ९० दिवसांत संभाव्य हानी ४५ लाख लिटरपर्यंत पोहोचू शकते. हा केवळ उदाहरणार्थ म्हणून स्थिर जलपृष्ठ आणि स्थिर बाष्पीभवन दरावर आधारित अंदाज आहे; प्रत्यक्ष हानी पाण्याची पातळी, जलपृष्ठ क्षेत्र आणि स्थानिक हवामानानुसार जास्तही असू शकते.

आता या उदाहरणाची दुसरी बाजू पाहूया. त्याच ठिकाणी पुनर्भरणासाठी योग्य संरचना उभारून पाणी उघड्यावर दीर्घकाळ साठवण्याऐवजी जमिनीत मुरवले, तर उघड्या जलपृष्ठावरून होणारे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते. अशा परिस्थितीत वरील उदाहरणातील ४.५ लाख लिटर ही संभाव्य बाष्पीभवन हानी टाळण्याची संधी असू शकते. दहा संरचनांच्या बाबतीत ही संधी ४५ लाख लिटरपर्यंत जाऊ शकते. अर्थात, हे संपूर्ण पाणी भूजल पुनर्भरण होईलच असे नाही. प्रत्यक्ष पुनर्भरण जमिनीची पारगम्यता, भूस्तरांची रचना आणि जलधारक स्तराच्या क्षमतेवर अवलंबून असेल.

हा फरक एखाद्या एका संरचनेपुरता मर्यादित नाही. CCT मध्ये पाणी चरांमध्ये साचून राहिल्यास बाष्पीभवन होते; मात्र योग्य जमिनीत त्याच पाण्याचे झिरपण तुलनेने जलद होऊ शकते. शोषखड्डे आणि जलतारामध्ये उघड्या पाण्याचा साठा कमी कालावधीसाठी राहत असल्यास बाष्पीभवनाची शक्यता कमी असते. याउलट पाझर तलाव आणि शेततळ्यांमध्ये मोठे जलपृष्ठ क्षेत्र आणि दीर्घ साठवण कालावधी असल्यास एकत्रित बाष्पीभवन लक्षणीय होऊ शकते. वनराई बंधारे, अनघड दगडी बांध आणि मातीचे बंधारे यांच्यामध्येही पाणी किती काळ आणि किती क्षेत्रावर साठते, यावर ही हानी अवलंबून असते.

म्हणूनच प्रश्न पाझर तलाव चांगला की शोषखड्डा वा जलतारा चांगला, असा नाही. प्रश्न असा आहे की, ज्या ठिकाणी कमी बाष्पीभवनासह प्रभावी पुनर्भरण शक्य आहे, त्याच ठिकाणी अधिक बाष्पीभवन होणारी संरचना उभारण्याची गरज नेमकी काय? भूगर्भीय परिस्थिती अनुकूल असताना केवळ मोठा जलसाठा दिसावा किंवा बांधकामाची क्षमता दाखवता यावी म्हणून उघड्या जलसाठ्याला प्राधान्य देणे योग्य ठरेल का? अथवा केवळ संरचनांची सुलभता पाहून, आकड्यांची संख्या वाढवण्यासाठी जर मोठ्या जल संरचनांऐवजी लहान संरचनांना प्राधान्य देणे योग्य ठरेल का?

विशेषतः दुष्काळप्रवण महाराष्ट्रात या निर्णयाचे परिणाम गंभीर असू शकतात हे आपल्याला लक्षातच येत नाही. पावसाळ्यात उपलब्ध झालेले पाणी उन्हाळ्यापर्यंत उघड्या साठ्यात टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करताना त्यातील मोठा हिस्सा बाष्पीभवनाने कमी होऊ शकतो. त्याच वेळी योग्य पुनर्भरण संरचनेचा पर्याय निवडला असता, तर त्यातील काही पाणी जमिनीच्या पोटात साठवून भविष्यात विहिरी आणि भूजल स्रोतांसाठी उपलब्ध करण्याची संधी मिळाली असती. म्हणजेच चुकीच्या संरचना निवडीमुळे केवळ बाष्पीभवनाचे नुकसान होत नाही, तर पर्यायी संरचनेतून मिळू शकणारा संभाव्य भूजल पुनर्भरणाचाही लाभ गमावला जाऊ शकतो. या दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.

यासाठी कोणत्याही पाणलोटात जलसंधारणाच्या प्रत्येक कामाच्या आराखड्यात पर्यायी संरचनांची तुलनात्मक तपासणी अनिवार्य असावी. उदाहरणार्थ, एकाच पाणलोट क्षेत्रात पाझर तलाव आणि पुनर्भरण संरचना या दोन्ही पर्यायांचा विचार करून त्यांचे बांधकाम खर्च, उघडे जलपृष्ठ क्षेत्र, अपेक्षित साठवण कालावधी, संभाव्य बाष्पीभवन, झिरपण्याची क्षमता आणि प्रत्यक्ष भूजल पुनर्भरण यांचा तुलनात्मक हिशेब मांडला पाहिजे. या विश्लेषणातून कोणत्या पर्यायात पाण्याचा अधिक उपयुक्त विनियोग होईल, हे स्पष्ट होऊ शकते.

जलसंधारणाच्या प्रकल्पात दोन प्रकारच्या खर्चांचा विचार झाला पाहिजे—संरचना उभारण्यासाठी होणारा आर्थिक खर्च आणि चुकीच्या संरचना निवडीमुळे गमावले जाणारे पाणी. पहिला खर्च अंदाजपत्रकात दिसतो; दुसऱ्या खर्चाची मात्र कुठेही नोंद नसते. त्यामुळे एखादी संरचना स्वस्त बांधली म्हणून ती अधिक किफायतशीर ठरत नाही. तिच्यामुळे होणारी संभाव्य जलहानीही खर्चाच्या तुलनेत धरली पाहिजे.

शेवटी, जलसंधारणाच्या यशाचे मोजमाप किती संरचना बांधल्या किंवा किती पाणी अडवले यावर न होता, उपलब्ध पाण्यापैकी किती पाणी बाष्पीभवनापासून वाचवले, किती प्रभावीपणे जमिनीत मुरवले आणि भविष्यातील वापरासाठी किती उपलब्ध केले, यावर झाले पाहिजे. कमी बाष्पीभवन होणारा आणि भूजल पुनर्भरणासाठी अधिक उपयुक्त पर्याय उपलब्ध असताना अधिक बाष्पीभवन होणारी संरचना निवडणे म्हणजे केवळ नियोजनातील चूक नव्हे; तर उपलब्ध जलसंपत्तीच्या संभाव्य नुकसानीला निमंत्रण देणे होय. पाणी अडवण्यापूर्वी ते कोणत्या संरचनेत अडवले तर सर्वाधिक वाचेल, हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group