• Contact us
  • About us
Wednesday, November 25, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीत वाहतूक पोलिसाच्या अंगावर ‘थार’ घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; बोनेटवरून ५० फूट फरफटत नेले!

mahaanewslive by mahaanewslive
November 25, 2026
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, Featured
0
बारामतीत वाहतूक पोलिसाच्या अंगावर ‘थार’ घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; बोनेटवरून ५० फूट फरफटत नेले!

​बारामती: ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर भरधाव ‘महिंद्रा थार’ घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरातील सम्यक चौकात घडली. बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा थरार घडला. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धीरज दत्तात्रय शेडगे असे गुन्हा दाखल झालेल्या ‘थार’ (क्र. MH-53-A-4400) चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सम्यक चौकात वाहतूक पोलीस कर्मचारी आपले शासकीय कर्तव्य बजावत होते. यावेळी ते महिंद्रा थार (क्र. MH-53-A-4400) या वाहनावर ई-चलन मशीन द्वारे कायदेशीर कारवाई करत होते. कारवाईपासून बचाव करण्याच्या उद्देशाने चालक धीरज शेडगे याने अचानक वाहनाचा वेग वाढवला आणि थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घातली.

​या धडकेत संबंधित पोलीस कर्मचारी थारच्या बोनेटवर जाऊन पडले. मात्र, माणुसकी विसरलेल्या चालकाने वाहन न थांबवता त्यांना बोनेटवरूनच सुमारे ४० ते ५० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. या प्रकारात पोलीस कर्मचाऱ्याच्या डाव्या हाताला आणि डाव्या पायाला दुखापत झाली आहे. घटनेनंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.

याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९ (खुनाचा प्रयत्न), १३२, १२१(१), २२१, २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, १७९(१), १००/१७७, ५०/१७७, ५१/१७७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भंडारे यांनी हा गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक पुजारी पुढील तपास करत आहेत. भरचौकात घडलेल्या या घटनेमुळे बारामतीत मोठी खळबळ उडाली असून पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group