• Contact us
  • About us
Wednesday, November 25, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’ची हाक

mahaanewslive by mahaanewslive
November 24, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, शेती शिवार, मराठवाडा, महाराष्ट्र, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, कोकण, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, विदर्भ, व्यक्ती विशेष, Featured
0
आमदार रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’ची हाक

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

‘या केवळ बातम्या नाहीत, तर दुष्काळाची भयाण वस्तुस्थिती!’

राज्यात ओढवलेल्या कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बळीराजाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. आजच्या विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या धक्कादायक घटनांचा आधार घेत आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “वृत्तपत्रांत येणाऱ्या या केवळ बातम्या नसून, ती राज्यातील दुष्काळाची विदारक वस्तुस्थिती आहे,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची हीच व्यथा सरकारदरबारी मांडण्यासाठी ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’चे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील विदारक परिस्थिती दर्शवणाऱ्या आजच्या तीन महत्त्वाच्या बातम्यांचा दाखला रोहित पवार यांनी आपल्या निवेदनात दिला आहे. यामध्ये दर्यापूर येथे नापिकीला कंटाळून कापूस उत्पादक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दुसऱ्या घटनेत, मेहकर येथे तीव्र पाणीटंचाईमुळे चार वर्षे पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेली मोसंबीची फळबाग एका शेतकऱ्याला नाइलाजाने जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट करावी लागली. तर तिसऱ्या घटनेत, राजस्थानमधून तब्बल २,००० किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या मेंढपाळांना दुष्काळाच्या झळांमुळे अकोटमध्येच रोखून त्यांच्या मेंढ्या परत पाठवण्याची वेळ आली आहे. या घटना राज्यातील शेती संकटाची तीव्रता स्पष्ट करतात, असे पवार यांनी नमूद केले.

​दुष्काळाच्या खाईत लोटल्या गेलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना तातडीने दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी १ लाख रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, असे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेली सक्तीची वसुली तात्काळ थांबवावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, रखडलेला पीकविमा वितरित करावा आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेला बोनस लवकरात लवकर द्यावा, अशा सर्व मागण्या मान्य करून सरकारने बळीराजाला दिलासा द्यावा, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group