जनआंदोलनासाठी ५० हजार रुपयांचा निधी सुपूर्द; विविध सामाजिक व संघटनात्मक विषयांवर मार्गदर्शन
बारामती : बारामती येथे रविवारी २२ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या बामसेफच्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरास बहुजन समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिराचे उद्घाटन बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. सचिन वाघ यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी प्रमुख प्रशिक्षक म्हणून बामसेफचे राष्ट्रीय प्रचारक डॉ. अमित नरवाडे उपस्थित होते. त्यांनी विविध सामाजिक आणि संघटनात्मक विषयांवर मौलिक मार्गदर्शन करत दिवसभर उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य कार्यकारिणी सदस्य ॲड. सुशील अहिवळे यांनी केले, तर सूत्रसंचालन सिद्धार्थ लोंढे यांनी आणि आभार प्रदर्शन ॲड. सनी बागाव यांनी केले. या शिबिरादरम्यान बारामती युनिटच्या वतीने ५० हजार रुपयांचा जनआंदोलन निधी डॉ. नरवाडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
या शिबिरास माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे, शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र ढवाण पाटील, बामसेफचे महासचिव आनंद थोरात, नथुराम हाटे, संभाजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष अमोल काटे, माजी नगराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, बापट कांबळे, ॲड. करीम बागवान, नितीन थोरात, नवनाथ अपूने, गौतम शिंदे, विजय खरात, उषा थोरात, ॲड. नीलम अहिवळे, पूजा लोंढे यांच्यासह बहुजन समाजातील विविध जाती-धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी विनोद मोरे, वैभव लोंढे, विश्वास लोंढे, सूरज लोंढे, नितीन गव्हाळे, संजय शिंदे, रितेश गायकवाड, शुभम अहिवळे, संतोष लोंढे, अमोल रणदिवे, रोहित लोंढे आणि सौरभ पोतदार यांनी विशेष परिश्रम घेतले.










