मुंबई/बारामती – महान्युज लाईव्ह
अजितदादांच्या अपघाती / घातपाती मृत्यूच्या सखोल आणि पारदर्शक चौकशीची गेल्या नऊ महिन्यांहून अधिक काळापासून आम्ही मागणी करतोय. मात्र प्रत्येक यंत्रणा एकमेकांकडं बोट दाखवून आपली जबाबदारी झटकताना दिसतेय, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या अपघात / घातपाताची सखोल चौकशी होऊन राज्यातील कोट्यवधी लोकांच्या मनातील प्रत्येक शंकेचं निरसन होण्यासाठी यामध्ये लक्ष घालण्याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
नऊ महिन्यांपासून मागणी, मात्र यंत्रणा जबाबदारी झटकतेय..
गेल्या नऊ महिन्यांहून अधिक काळापासून सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी करूनही प्रत्येक यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकताना दिसत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. कोट्यवधी लोकांच्या मनातील शंका दूर व्हाव्यात, अजितदादांच्या अपघात / घातपाताची सखोल चौकशी होऊन राज्यातील कोट्यवधी लोकांच्या मनातील प्रत्येक शंकेचं निरसन व्हावे, यासाठीच हे पत्र दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमित शाह आणि राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा
सरकार म्हणून गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांच्याकडून या पत्राची गांभीर्याने दखल घेतली जाईल आणि त्यावर योग्य कार्यवाही होईल, ही अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. या पत्रानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या चौकशीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.










