• Contact us
  • About us
Thursday, November 12, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजितदादांच्या आठवणींना अश्रूंची झालर; विद्या प्रतिष्ठानमधील स्मृतिस्थळ पाडव्याच्या कृतज्ञता दिव्यांनी उजळणार..!

mahaanewslive by mahaanewslive
November 9, 2026
in सामाजिक, शिक्षण, महिला विश्व, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
अजितदादांच्या आठवणींना अश्रूंची झालर; विद्या प्रतिष्ठानमधील स्मृतिस्थळ पाडव्याच्या कृतज्ञता दिव्यांनी उजळणार..!

बारामती : प्रत्येक दिवाळी पाडव्याला ज्या हक्काच्या पाठीराख्याच्या भेटीसाठी पावले विद्या प्रतिष्ठानकडे वळायची, त्या वाटेवर आज शब्द मुके झाले असून डोळे पाणावले आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच पाडव्याची पहाट बारामतीकरांसाठी आणि विशेषतः त्यांच्या प्रेरणेने प्रशासकीय सेवेत पोहोचलेल्या लेकरांसाठी अतीव वेदनादायी ठरत आहे.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना अधिकारी होण्याचे स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवणारा हा आधारवड हरपल्याने, देशभरात विविध उच्च पदांवर कार्यरत असलेले बारामतीचे अधिकारी-कर्मचारी मंगळवारी दि. १० नोव्हेंबर रोजी विद्या प्रतिष्ठान येथील दादांच्या स्मृतिस्थळावर एकत्र येत आहेत. सायंकाळी ५ वाजता पाडव्यानिमित्त ‘एक दीप कृतज्ञतेचा’ प्रज्वलित करून ते आपल्या लाडक्या नेत्याच्या चरणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करणार आहेत.

बारामतीसारख्या ग्रामीण मातीत जन्मलेल्या हजारो युवक-युवतींना स्पर्धापरीक्षेच्या माध्यमातून वर्ग १ आणि वर्ग २ च्या शासकीय सेवेत पोहोचवण्यात अजितदादांचा वाटा केवळ नेत्याचा नव्हता, तर एका कणखर कुटुंबप्रमुखाचा होता. विद्यार्थ्यांना अद्ययावत अभ्यासिका, सुविधा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यापासून ते थेट प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांच्या पाठीशी खंबीर ढाल बनून उभे राहण्यापर्यंत दादांनी प्रत्येक पावलावर साथ दिली.

दिवाळीच्या पाडव्याला दादांना भेटून त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळवणे हा या अधिकाऱ्यांचा दरवर्षीचा हक्काचा क्षण असायचा; मात्र यंदा तो प्रेमळ हात पाठीवर नसून केवळ त्यांच्या पवित्र आठवणी उरल्या आहेत. हीच कृतज्ञतेची आणि दुःखाची भावना मनात साठवून, ‘आपली बारामती, आपली माणसं’ या समूहाच्या वतीने या अभिवादन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावी परतलेल्या सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या भावनिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group