• Contact us
  • About us
Friday, November 6, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामती हादरली! कोयत्याने दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार जयेश माने अखेर जेरबंद; सिनेमॅटिक पाठलाग करत बारामती शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

mahaanewslive by mahaanewslive
November 4, 2026
in महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, Featured
0
पुणे पोलिसांचा मोठा निर्णय : २५ हून अधिक दिग्गजांचे पोलीस संरक्षण हटवले; उद्योजक राणा सूर्यवंशी आणि लक्ष्मण हाकेंची सुरक्षा मात्र ‘जैसे थे’!

बारामती (विशेष प्रतिनिधी): बारामती शहरात शस्त्रांचा धाक दाखवून अपहरण करणे, हवेत कोयते फिरवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे आणि तरुणावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बारामती शहर पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. जयेश बाळासाहेब माने असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो यापूर्वीच्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी आहे. न्यायालयाने त्याला ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

​अपहरण करून डोक्याला लावले रिव्हॉल्वर, पायावर कोयत्याचे सपासप वार

​मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास बारामतीतील ग्रीन सिटी परिसरातील अक्षदा गार्डनजवळ ही थरारक घटना घडली होती. फिर्यादी सुमित संतोष सोनवणे (वय २१, रा. बारामती) याला आरोपी जयेश माने, सोमा यादव आणि प्रतीक यांनी अडवून जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसवले आणि ग्रीन सिटी मैदानात नेले.

जुनी भांडणे आणि मित्रांसोबत फिरण्याच्या कारणावरून आरोपींनी सुमितशी वाद घातला. यावेळी आरोपी जयेश माने याने सुमितच्या डोक्याला रिव्हॉल्वरसारखे दिसणारे शस्त्र लावून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी हातात धारदार लाकडी मुठीचे कोयते हवेत फिरवून शिवीगाळ करत परिसरात प्रचंड दहशत माजवली. दहशतीमुळे परिसरातील नागरिक जीव मुठीत धरून पळाले. जयेश माने याने सुमितच्या मान व छातीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला; मात्र सुमितने दोन्ही पाय वर करून बचाव केल्याने वार त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर बसला. गंभीर जखमी झालेल्या सुमितवर सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपचार करून सात टाके घालण्यात आले. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​चहाच्या दुकानाजवळ रचला सापळा; पोलिसांना पाहून पळताना सिनेमॅटिक पाठलाग

गुन्ह्याचा तपास सुरू असताना ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांना गोपनीय बातमी मिळाली की, आरोपी जयेश माने खंडोबानगर परिसरातील काठियावाडी चहाच्या दुकानाजवळ येणार आहे. सिताफ यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विजय हरी टेळकीकर, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, पोलीस शिपाई सागर जामदार आणि अक्षय सिताफ यांच्या पथकाने सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस शिपाई सागर जामदार यांनी तत्परतेने त्याचा पाठलाग करून त्याला झडप घालून ताब्यात घेतले. कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून रात्री ११ वाजता त्याला अटक करण्यात आली.

​आरोपीचा गुन्हेगारी इतिहास; २०२४ मध्ये खुनाचा गुन्हा

अटक आरोपी जयेश माने याचा पूर्वेतिहास अत्यंत हिंसक राहिला आहे: सन २०२४: जळोची येथील काळ्या ओढ्याजवळ गणेश धुळाबापू वाघमोडे (वय १७) या अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल. सन २०२५: बारामती तालुका पोलीस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल. सन २०२६: आता पुन्हा कोयत्याने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची (७ नोव्हेंबरपर्यंत) पोलीस कोठडी मंजूर केली आहे. गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, कोयते, रिव्हॉल्वर जप्त करणे तसेच फरार आरोपी सोमा यादव व प्रतीक यांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान शहरात शस्त्रे उगारून दहशत माजवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांनी कोणत्याही दहशतीला बळी न पडता संशयास्पद हालचालींची माहिती थेट ११२ किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात द्यावी; माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, परिविक्षाधीन उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी मनीषा ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय हरी टेळकीकर करत आहेत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group