• Contact us
  • About us
Wednesday, November 4, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोकुळाचा केला घात रे.. आज लोकशाहीला लोकशाही ओशाळली..!

mahaanewslive by mahaanewslive
November 4, 2026
in संपादकीय, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
गोकुळाचा केला घात रे.. आज लोकशाहीला लोकशाही ओशाळली..!

ज्ञानेश्वर रायते, बारामती

कसं काय पाटील बरं हाय का? आज काय ऐकलं ते खरं हाय का? मंडळी, पाच वर्ष झालं गळा फोडतोय.. लोकशाही संपल्याचा गजर करतोय.. कुणीच इकडं फिरकत नाही.. म्हणून आज ही वेळ आली..! गोकुळाचा केला घात.. आज लोकशाही ओशाळली..सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, तरीपण आता वाहतो शिव्यांची लाखोली..!

खरंतर सुरुवात त्यांनीच केली.. आम्हीच जिंकणार आम्हीच राजे असा भरवसा होता त्यांना, मग ते म्हणाले.. लोक हो, तुम्ही तर या लोकशाहीचे राजे.. असं म्हणत मग या राजाला बळंच घोड्यावर बसवलं.. दगा देईल अशी फिरकत होती, म्हणून काळजीनं शपथ घ्यायला लावलं..! तरीही झालाच दगाफटका तर? बरं पैसेही मोप वाटलं..! मग मंडळी, राजे आले मतदानाला.. गोठा होता गायीचा.. त्यांनी मोठा गेम केला.. खरंच आम्ही राजे म्हणत.. गोट्याऐवजी  ‘घोडा’ आणि तबेला दाखवला.. ही कोल्हापूरची भूमी म्हणत, साऱ्यांनी चंग की हो हा बांधला.. एवढी सत्ता अघोरी तरी पाटलांचा बंटी जिंकला..!

मंडळी प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही.. या देशात आणि राज्यात लोकशाही शिल्लक उरली नाही असं विरोधक छताडावर पिठून-पिटून सांगत असले, तरी अजूनही आमच्या डोळ्यावर झापड कायम आहे.. आणि म्हणूनच सत्तेतल्या शहाणपणाचे धाडस अजून वाढतेच आहे.. हरलो संपलं सगळं एवढं जरी माहित आहे तरीसुद्धा जिंकण्याची धुगधुगी अजूनही कायम आहे…एका गोकुळासाठी बऱ्याच क्लृप्त्या केल्या, तरी देखील डाव काही जमला नाही..पण ते म्हणाले , हातावर हात ठेवणं आमच्या धोरणात नाही..

तेवढ्यात बातमी वाचली.. लोकांनी नाकारलं, अन् बरीच आदळआपट करूनही आपला अध्यक्ष होत नाही.. म्हणून चक्क मंत्रीमंडळ अख्खं एकवटलं.. सगळे डाव फिस्कटले तरी सत्ता विस्कटू द्यायची नाही.. हे सगळ्यांना पटलं..आमचे लोक निवडून नसले आले म्हणून काय झालं? आमच्या हतात सत्ता आहे .. मग सगळ्यांनी मिळून या लोकशाहीचा बांडविस्तारा गुंडाळला.. सरकारी चार जण नेमले.. मतदानाचे अधिकार दिले.. आणि एकदाचा लोकशाहीचा मांडव विसर्जित केला..!

रांडीच्यांनो,  आरं एका..एका दूध संघाचं काय करता, एवढं ते राजकारण? अरे कसला भस्म्या झालाय तुम्हाला? माझं ते माझ्या बापाचंच.. पण तुझं तेही माझ्या बापाचं.. एवढा राजा मदमस्त कसा झाला? अजूनही आहे हिम्मत आमच्या धमन्यांत.. अजून किती खाली घसरताय, तेच आम्हाला पाहायचंय; गोकुळ फक्त टोक आहे रे; अजून हिमनग बाकी हाय! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group