• Contact us
  • About us
Thursday, October 29, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुष्काळाच्या तीव्र झळा: नीरा नदी, खडकवासला व नीरा डावा कालव्यातून तातडीने आवर्तन सोडा; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची सरकारकडे आग्रही मागणी!

mahaanewslive by mahaanewslive
October 27, 2026
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, ताज्या बातम्या, पर्यावरण, पुणे, Featured
0
बिहारमधील ऊस विकासासाठी ‘नोडल एजन्सी’ म्हणून सहकार्यास राष्ट्रीय साखर महासंघ तयार : अध्यक्ष हर्षवर्धन पाटील

​शेटफळ तलावातूनही ५ महिन्यांनी पाणी सोडण्याची मागणी; आगामी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णयाकडे शेतकऱ्यांचे डोळे

डॉ. संदेश शहा, इंदापूर

सध्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीत नीरा नदीकाठसह संपूर्ण परिसरातील शेती, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर चालू महिन्याअखेर होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. भाटघर धरणातून नीरा नदीत पाणी सोडणे, दोन्ही प्रमुख कालव्यांमधून ‘टेल टू हेड’ पद्धतीने आवर्तन देणे आणि शेटफळ तलावातून तत्काळ पाणी सोडण्याबाबत त्यांनी शासन व प्रशासनाला पत्र पाठवून लक्ष वेधले आहे.

​शासनाच्या उच्चपदस्थांकडे पत्राद्वारे दाद

हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्राताई पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे आणि कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांना सविस्तर पत्र पाठविले आहे. आगामी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत यावर सकारात्मक चर्चा होऊन ठोस निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी व्यक्त केला. या महत्त्वपूर्ण बैठकीस हर्षवर्धन पाटील स्वतः उपस्थित राहणार आहेत.

​नीरा नदीपात्रात ३ टीएमसी पाण्याची तातडीची गरज

सध्याच्या दुष्काळामुळे नीरा नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे ठणठणीत पडले आहे. यामुळे नदीकाठच्या बहुतांश गावांमधील नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या असून जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. भाटघर धरणातून नीरा नदीपात्रात सुमारे ३ टीएमसी पाणी तातडीने सोडावे. नदीवरील बंधाऱ्यांचे किमान ३ ढापे अडवून पाणी साठवावे. यामुळे इंदापूर, बारामती, फलटण आणि माळशिरस या चारही तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना, शेतीला व जनावरांना मोठा आधार मिळेल, असे पाटील यांनी नमूद केले.

    ​‘टेल टू हेड’ पद्धतीने आवर्तन सोडण्याचा आग्रह

    नीरा डावा कालवा व खडकवासला कालव्यातून पाण्याचे वाटप करताना सुरुवातीला शेवटाकडील (टेल) भागाला प्राधान्य देऊन म्हणजेच इंदापूर तालुक्यापासून ‘टेल टू हेड’ पद्धतीने आवर्तन सोडण्यात यावे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. यामुळे शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचून शेती पिके, चारा व पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल. इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली तलावामध्ये सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. असे असतानाही तलावाच्या लाभक्षेत्रातील १० गावांना गेल्या ५ महिन्यांपासून आवर्तन देण्यात आलेले नाही.

    त्यामुळे या भागातील नागरिक व जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत. हा अन्याय दूर करून शेटफळ तलावातून तातडीने आवर्तन सुरू करावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. दुष्काळाच्या या संकटात पाण्याचे काटेकोर नियोजन करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सकारात्मक निर्णय होणे अनिवार्य असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

    उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

    October 15, 2026
    उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

    उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

    October 15, 2026
    कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

    आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

    October 15, 2026
    दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

    दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

    October 15, 2026
    श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

    श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

    October 15, 2026
    जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

    जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

    October 14, 2026
    पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

    पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

    October 14, 2026
    भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

    भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

    October 14, 2026
    राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

    राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

    October 14, 2026
    श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

    श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

    October 14, 2026
    Load More

    Website Maintained by : Tushar Bhambare

    No Result
    View All Result
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
      • पुणे
      • मुंबई
      • कोकण
      • मराठवाडा
      • विदर्भ
      • उत्तर महाराष्ट्र
      • पश्चिम महाराष्ट्र
    • राजकीय
    • क्राईम डायरी
    • मनोरंजन
    • महिला विश्व
    • व्यक्ती विशेष
    • शेती शिवार
    • लाईव्ह

    Website Maintained by : Tushar Bhambare

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In
    कॉपी करू नका.
    Join WhatsApp Group