• Contact us
  • About us
Saturday, October 24, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिंदू हिंदू” करत तुमच्या मनात धर्मांधता पेरणाऱ्या लोकांचा हेतू तुम्हाला ‘गुलाम’ बनवण्याचा

mahaanewslive by mahaanewslive
October 23, 2026
in सामाजिक, सुरक्षा, मराठवाडा, महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, कोकण, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
हिंदू हिंदू” करत तुमच्या मनात धर्मांधता पेरणाऱ्या लोकांचा हेतू तुम्हाला ‘गुलाम’ बनवण्याचा

किरण माने, मराठी चित्रपट अभिनेते

“शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून लक्ष हटवण्यासाठी हिंदू-मुस्लिम करा.” हे आहे या संगोट्यांचे हिंदुत्व आणि हे आहे यांचं शिवप्रेम ! जरांगेंनी पुरावे सादर करून ‘दूध का दूध पानी का पानी’ केलंय. याची चौकशी होईलच… पण ही गोष्ट साधी नाही. भरकटलेल्या हिंदू बहुजनांनो, आता तरी आपल्या धडावर आपलंच डोकं ठेऊन विचार करा. “हिंदू हिंदू” करत तुमच्या मनात धर्मांधता पेरणाऱ्या लोकांचा हेतू तुम्हाला ‘गुलाम’ बनवण्याचा आहे. त्यांच्या नादाला लागून आपल्या मुलाबाळांचं भविष्य विकू नका.

तुमचं हिंदू धर्मावर प्रेम आहे ना… मग साधा विचार करा… अंतरवाली सराटीत हिंदू भावाबहिणींवर क्रूर लाठीहल्ला झाला होता तेव्हा कुठं गेलं यांचं हिंदुत्व??? कोरटकर सारखा संगोटा शिवरायांना, शंभूराजांना अश्लील शिव्या देतो तेव्हा का उमाळा येत नाही यांना हिंदुत्वाचा?? शिवशंभू आणि जिजाऊ मातेविषयी अपशब्द वापरणाऱ्या कोरटकरच्या ठिकाणी कुणी मुस्लिम असता, तर यांनी तुम्हाला हाताशी घेऊन महाराष्ट्र पेटवला असता…

‘शिवद्रोह करणारे कोरटकर, सोलापूरकर, छिंदम अजून तुमच्या संरक्षणाखाली मजेत कसे? असा जाब हिंदूंच्या वतीनं कधी विचारला त्यांनी???…या कावेबाजांनी तुम्हाला हाताशी धरून आपलं हिंदुत्व एका राजकीय संघटनेच्या दावणीला बांधलं आहे, हे लक्षात घ्या.

मराठा बांधव उभे राहीले की ओबीसी बांधवांना फूस लावतात आणि मातंग बांधवांना आपल्याच सख्ख्या भावाविरूद्ध लढवतात हा डाव कशासाठी सुरू आहे हे जर तुम्हाला कळाले नाही… तर तुम्ही या नीच मनुवाद्यांसाठी आपल्याच खर्‍या हिंदू धर्माचे लचके तोडाल. आपला हिंदू धर्म इतका लेचापेचा नाही की तो तारण्यासाठी कुणा टुकार राजकीय नेत्याची गरज असावी. उलट राम मंदिरात यांनी केलेल्या चोरीनं जगात आपली बदनामीच झाली आहे.

हिंदू धर्म जगात भारी ठरवायचा आहे ना? तर मग “पंढरीसी नाही कोणा अभिमान… पाया पडती जन एकमेकां” हा संदेश जगापर्यंत पोहोचवा… ‘ज्ञानोबा- तुकारामा’चा धर्मच जगात आपली मान ताठ करणार आहे. माणसाची जातधर्म न बघता “माऊलीS” म्हणत त्याच्या पाया पडणारा आपला धर्म आहे, हे जर जगाला कळलं, तर अख्खं जग हिंदू धर्माला काळजात स्थान देईल. आपला “चांगभलंS” हा गजर जगाचं चांगलं चिंतणारा आहे हे कळलं तर, जोतिबाचा गुलाल आणि खंडोबाचा भंडारा उधळण्याचा सोहळा सगळं जग बघेल.

जरांगेंनी सादर केलेल्या फोन मध्ये बोलणार्‍या व्यक्ती कोण आहेत याच्याशी मला देणंघेणं नाही… त्या व्यक्ती ज्या ‘विचारधारेच्या’ आहेत, ती वृत्ती आपल्या हिंदू धर्माची आणि छत्रपतींच्या स्वराज्याची दुश्मन आहे. ‘हिंदू खतरेमें’ असेल तर महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याचा वापर, मुस्लिमद्वेष पसरवण्यासाठी करून घेणाऱ्यांमुळे आहे, हे मेंदूत कोरून ठेवा. पंढरीनाथ महाराज की जय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group