• Contact us
  • About us
Wednesday, October 21, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे ही तर भीमथडी.. १२ बुद्धीची १२ माणसं.. इथे सूर्याचा असो की चंद्राचा वंश..इथं खोट्याचं खोटं आणि खऱ्याचं खरं होतंच की..!

mahaanewslive by mahaanewslive
October 20, 2026
in आरोग्य, आर्थिक, कथा, Featured
0
अरे ही तर भीमथडी.. १२ बुद्धीची १२ माणसं.. इथे सूर्याचा असो की चंद्राचा वंश..इथं खोट्याचं खोटं आणि खऱ्याचं खरं होतंच की..!

ज्ञानेश्वर रायते, बारामती 

आटपाट नगरातला युवराज होता भारी…तामजाम घेऊन हिंडायची सवय त्याला न्यारी..! समाजसेवकाचा आव आणत, दोन-चार गोड काम करत, साऱ्यांवर ताव मारत फिरायचा..मंडळी, ‘सायरन‘ वाजवत तो अगदी शहरातूनही फिरायचा..का? तर बडा साहेब.. त्याच्या ओळखीचा जो होता..त्याच्या जीवावरच तर त्याचा रुबाब सुरू होता..

एकदा काय झालं? पहारेकर्‍यांनी त्याच्याभोवतीचा फौजफाटा कमी केला..तामजाम त्याचा जसा कमी जरा झाला..अस्वस्थ युवराज फेऱ्या मारू लागला.. चाटूकार मग त्याच्या कानी जरा लागला.. युवराज, तामजाम ठेवायचा असेल अखंड, तर मी सांगतो त्यात फायदा तुमचा भला..! युवराजानं ती आयडिया ऐकली.. त्याला ती लईच भारी वाटली..मग अकलीच्या कोटात रस्त्यावरच्या चौकात रथ कोणी अडवला..! 

लुटुपुटीच्या लढाईत एक घाव त्याला लागला.. ठरल्यानुसार घडून आलं.. असं त्याला वाटत होतं..पण पहारेकऱ्यांना सुध्दा इंगित सगळं खरंखुरं माहीत होतं, हा सगळा बनाव होता.. सगळा बेत त्याचाच होता.. मारेकरी तर सुपारीबाज, तोही त्याचाच म्हणे मांडलिक होता..पण पहारेकरी तरी काय करणार? बडा साहेब त्याच्या ओळखीचा जो होता.. पहिलीच घटना तपास तर लावायचाच होता..! तपास लागला येतात आताच

पण मंडळी बघा, घटना घडायचा अवकाश.. सोक्षमोक्ष लागायचा अवकाश..साहेबानं लगीच आदेश दिला..झालं, लगेच पहारा पुन्हा वाढला..! युवराज गालातल्या गालात हसला.. पुन्हा एकदा शहरात तो सायरन वाजवत फिरत राहिला.. मग पुढे काय झालं?  पहारेकरी होते सावध, त्यांनी फौजफाटा देताना अट एक टाकली होती.. वर्षाचीच पहाऱ्याची बेगमी त्यांनी करून ठेवली होती..! वर्षानंतर पहारा जाणार.. हे तर निश्चितच होतं.. पहारा गेला तर? पण पुन्हा एकदा युवराजच्या मनात नवीन स्वप्न आकार घेत होतं..!

आता आपला पहारा जाणार.. युवराज जरा अस्वस्थ होता..! भीमथडीच्या तट्टांना आता पाणी पाजायचं म्हणत होता.. त्याच्या डोक्यात पुन्हा एकदा नवं स्वप्न थैमान घालू लागलं.. आणि एका दगडात अनेक पक्षी मारू असं त्यांना ठरवलं.. वेळ ठरली.. वार ठरला. दिवस सुद्धा भरून आला..

संध्याकाळची वेळ होती.. एक जमीन त्याला पाहायची होती.. पुलाच्या भोवती थोडी गर्दी होती.. मग बेत नवा आखला.. पूल जरा मागे टाकला.. रथ जरा पुढं हाकला.. निर्जन स्थळी युवराज थांबला.. सोबतीला एक जोडीदार घेतला.. पहारा थोडा लांब ठेवला.. अन.. ठरल्यानुसार.. अगदी ठरल्यानुसार गारदी आले..! फोटो काढायचे म्हणू लागले.. चेहरा होता बांधलेला.. युवराजाला संकेत पटले.. सगळं मनासारखे घडून आले..!

पुन्हा एकदा घाव लागला.. युवराज कोसळला..गारदी ठरल्यानुसार पळून गेले.. काय घडले? काय घडले? आकांत सगळा सुरू झाला.. सगळं मनासारखं घडून आलं..इकडे बँडबाजा सज्ज होता… ठरल्यानुसार सांगावा झाला.. युवराज म्हणे बेहोश झाला.. इथे उपचार करावं, तर आपली बेकी बाहेर पडेल.. म्हणून जामानिमा, बिस्तर सगळं आवरून राजधानीकडे सगळा थवा निघून गेला..

हल्ला झाला.. हल्ला झाला.. गहजब सगळ्या जगात झाला.. बड्या साहेबांना घाईघाईने कॅमेरा गाठला.. जाहीर करून टाकलं, कठोरात कठोर कारवाई करा.. पुन्हा पहारेकऱ्यांना निरोप गेले.. आता पहारेकरी सावध झाले.. आयला ह्यो तर गेल्यावर्षी सारखाच प्रकार.. असा बनाव किती दिवस चालणार? अस्वस्थ पहारेकऱ्यांनी तपास मात्र सुरू केला..! अन हल्लेखोर पकडताच, युवराजाचा सारथी देखील जेरबंद केला.. हल्लेखोर सापडले.. पण सारथ्यानं नेमकं काय केलं होतं?

गंमत झाली अशी.. तो गंभीर होता हल्ला.. आणि दिसू लागली दत्ताची ‘कला’.. पायापर्यंत पोहोचवायचा होता ‘झोळ’.. पण इथेच खरा ‘घोळ’ झाला..! नाथांचे नऊ अवतार.. ताब्यात कुणाला तरी घ्यायचे होते.. पण नियतीला नव्हतंच मान्य, जे अगोदर झालं तेच बनावट पुन्हा कसं करायचं? मग गारदी तर सापडलाच सापडला, पण सारथी सुध्दा सापडला..! पहारेकरी आहेत सावध, हा मंत्र त्यातून मिळाला..!!

मंडळी तर ही होती, 60 प्रश्नांची पाच उत्तराची सुफळ संपूर्ण कहाणी.. जी अजून संपलीच नाही..! राजसत्तेचा अमर्याद आणि बेधुंद वापर.. जेव्हा जनता डोळ्यासमोर पाहते.. तिच्या हाती काहीच नसतं, पण ती मुकी नसते.. ती असते पाहत या सगळ्या माजलेल्या स्वैर अंदाधुंद सत्तेकडे.. मनातल्या मनात चरफडत.. की कधीतरी दिवस येतील न्यायाचे; मग पैशाच्या जोरावर कुठपर्यंत मजल मारणार? अन आता तर पहाट होऊ लागली आहे.. देश विदेशात जनतेच्या निशाण्यावर राजा आहे..! 

लोकशाही आली तशी राजेशाही गेली..म्हणून म्हणतो, सदसदविवेक बुद्धी महत्त्वाची.. पैसा काय? आज हाय तर उद्या नाय.. पैशाच्या जोरावरचा माज गड्यांनो, शेवटपर्यंत काही पुरत नाही.. कधीतरी या पैशाचा आणि सत्तेचा माज मोडीत निघतो.. कधी ‘जंतर-मंतर’ कधीतरी ‘गोकुळ’ होतो.. जनता पाहते आहे.. जनतेच्या पहारेकऱ्यांनो, नजरेत नजर घालून पहा, कोणासोबत काय घडतंय? कोण कोणासोबत काय करतंय? लक्षात ठेवा भीमथडीचे घोडे यमुनेचे पाणी पिलेत.. त्यांना पण समज जरा चांगली आहे.. अन चालू द्या तुमचं.. आमचं तुमच्याकडे लक्ष आहे..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group