• Contact us
  • About us
Monday, October 19, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीत आनंदोत्सवाच्या नावाखाली सार्वजनिक रस्त्यांवर फटाक्यांचा ‘धुरळा’ उडवाल तर थेट कोठडीची हवा!

mahaanewslive by mahaanewslive
October 17, 2026
in सामाजिक, सुरक्षा, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
सुपेतील सलग अपघातांनंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये; अल्पवयीनांच्या वाहनचालकांवर कठोर कारवाईचा इशारा..!

​सण साजरा करायचाय की इतरांचा जीव धोक्यात घालायचा? बारामती पोलिसांचा नियम मोडणाऱ्यांना कडक इशारा; मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची शहरात कडक अंमलबजावणी सुरू.

बारामती : महान्यूज लाईव्ह

सण-उत्सव म्हणजे आनंद, उत्साह आणि मांगल्याचे प्रतीक. मात्र गेल्या काही वर्षांत या आनंदाचे रूपांतर रस्त्यांवर होणारा कानठळ्या बसवणारा गोंधळ, डोळे दिपवणारे धोकादायक लेझर बीम्स आणि हवेत पसरणारे विषारी वायू यात झाले आहे. “आमचा सण, आमची मर्जी” अशा बेफिकिरीने वागणाऱ्यांना आता कायद्याचा सणसणीत दणका बसणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कठोर आदेशानंतर बारामती शहर पोलिसांनी जाहीर नोटीस बजावत स्पष्ट केले आहे की सार्वजनिक रस्ते, चौक किंवा गल्लीबोळात फटाके वाजवले, बेकायदेशीर डीजे ठोकला किंवा धोकादायक लेझर लाईट्स चमकवल्या, तर थेट कायदेशीर कारवाई आणि साहित्य जप्ती होणार आहे.

​मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी व न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, हा आदेश केवळ एका सणापुरता मर्यादित नसून दिवाळी, दसरा, गणेशोत्सव यांसह वर्षभरातील सर्वच सणांना लागू आहे. अनेकदा उत्साहाच्या भरात मुख्य रस्त्यांवर, पादचाऱ्यांच्या अंगावर किंवा गाड्यांच्या चाकाखाली येतील अशा पद्धतीने फटाके फोडले जातात. यामुळे होणारे अपघात, भाजण्याच्या घटना आणि निष्पाप पादचाऱ्यांना होणारा त्रास आता खपवून घेतला जाणार नाही. रस्त्यावर फटाके फोडण्यास चोवीस तास पूर्ण बंदी असून सकाळचे सहा ते रात्री दहा ही वेळ रस्त्यावरील फटाकेबाजीसाठी कोणतीही मुभा देत नाही.

​उत्सवाच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत अवाढव्य डीजे सिस्टीम वाजवणे, डोळ्यांचे कायमचे नुकसान करू शकतील अशा लेझर लाईटचा वापर करणे आणि रुग्णालये तसेच शाळांच्या आवारात दणदणाट करणे ही विकृती आहे, संस्कृती नव्हे. फटाक्यांच्या विषारी धुरामुळे दमा, श्वसनविकार आणि हृदयविकाराच्या रुग्णांचा श्वास गुदमरतो. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ अन्वये प्रत्येक नागरिकाला शांततेत आणि आरोग्यदायी वातावरणात जगण्याचा मूलभूत अधिकार आहे, तर अनुच्छेद ५१-अ (ग) नुसार पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे तात्पुरता आनंद कोणाच्या तरी जिवावर बेतणारा ठरू नये, याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

​या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर, पदपथांवर आणि चौकांत फटाके फोडण्यास पूर्ण मज्जाव घालण्यात आला असून फटाके केवळ स्वतःच्या खासगी जागेत आणि ठरवून दिलेल्या मर्यादेतच वाजवावे लागतील. रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत आवाज करणारे फटाके वाजवल्यास थेट ध्वनीप्रदूषण कायद्यांतर्गत कारवाई होईल. याशिवाय रुग्णालये, शाळा, न्यायालये यांसारख्या शांतता क्षेत्रांच्या परिसरात फटाके, डीजे किंवा वाद्ये वाजवण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. डोळ्यांना इजा पोहोचवणाऱ्या अतितीव्र लेझर लाईट्स आणि विनापरवाना डीजे सिस्टीमवर थेट जप्तीची कारवाई केली जाणार असून फटाके विक्रेत्यांनी बेकायदेशीर साठा न करता केवळ कमी प्रदूषण करणाऱ्या हरित फटाक्यांचीच विक्री करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

बारामती शहर पोलीस प्रशासनाने बजावले आहे की, न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही गय न करता गुन्हे दाखल केले जातील आणि त्यांची यंत्रसामग्री जप्त केली जाईल. सण-उत्सव परंपरेनुसार, उत्साहात आणि इतरांच्या जिवाची काळजी घेऊन साजरे व्हावेत. नागरिकांना कुठेही अशा प्रकारे रस्त्यांवर फटाकेबाजी, कर्णकर्कश डीजे किंवा लेझर लाईटचा गैरवापर आढळल्यास त्यांनी स्वतः वाद न घालता तातडीने ११२ या क्रमांकावर किंवा बारामती शहर पोलिसांशी संपर्क साधावा. आपला आनंद दुसऱ्यासाठी संकट ठरणार नाही याची खबरदारी घेत सर्वांनी प्रदूषणमुक्त आणि सुरक्षित बारामतीसाठी सहकार्य करावे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group