• Contact us
  • About us
Tuesday, November 24, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जय पवारांची सोमेश्वरच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात युगेंद्र पवारांवर आणि पुरुषोत्तम जगतापांवर थेट टीका

mahaanewslive by mahaanewslive
October 8, 2026
in महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पुणे, Featured
0
जय पवारांची सोमेश्वरच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात युगेंद्र पवारांवर आणि पुरुषोत्तम जगतापांवर थेट टीका

‘बिनबुडाचे आरोप करून दिशाभूल करू नका; सभासदांना वस्तुस्थिती ठाऊक आहे’ : जय पवारांचा युगेंद्र पवारांवर थेट प्रहार

​‘शेवटच्या क्षणापर्यंत समन्वयाचा प्रयत्न केला, पण जगतापांचा हेतू वेगळाच होता’; पुरुषोत्तम जगतापांच्या भूमिकेवर उघड नाराजी

बारामती : आम्ही अखेरपर्यंत सर्व घटकांना सोबत घेऊन तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दादांचे संपूर्ण कुटुंब एकत्र आहे, अशीच आमची भावना होती. मात्र पुरुषोत्तम जगतापांच्या मनात वेगळीच गणिते सुरू होती आणि त्यांनी सर्वांना विश्वासात न घेता बाजूला सारले, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जय पवार यांनी सांगितले की, अपघाताच्या त्या दुर्दैवी क्षणीही दादांकडे जनहिताच्या कामांशी संबंधित कागदपत्रेच होती. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी जनतेसाठी स्वतःला झोकून दिले होते. दादांच्या जाण्यानंतर मन खचले होते; सार्वजनिक जीवन सोडून कुटुंबाकडे, आईकडे लक्ष द्यावे असा विचारही आला. पण त्या दुःखाच्या काळात जनतेने दादांवर दाखवलेले अपार प्रेम पाहून मी अंतर्मुख झालो. त्यातूनच निर्धार केला की, दादांचा हा सेवेचा वारसा आपण आयुष्यभर निष्ठेने पुढे चालवायचा.

​एकत्र येण्याबाबत घडलेली चर्चा

काही दिवसांपूर्वीच्या घडामोडींचा संदर्भ देत जय पवार म्हणाले, सुप्रिया आत्यांच्या निवासस्थानी रेवतीला भेटायला गेलो असताना सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली होती. युगेंद्र पवारांनीच एकत्र येण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर पार्थदादांनी स्पष्ट भूमिका मांडली होती की, ‘आमच्याशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते स्वतंत्र लढण्याचा आग्रह धरत आहेत. ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही उभे आहोत, त्यांचा आवाज डावलता येणार नाही.’ अर्थात तरीही सामोपचाराने मार्ग निघेल, अशी आम्हाला खात्री वाटत होती.

​माळेगाव कारखान्यावरील आरोपांना चोख प्रत्युत्तर

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक स्थितीबाबत युगेंद्र पवारांनी केलेल्या दाव्यांचा त्यांनी जोरदार समाचार घेतला. “दादांच्या पश्चात कारखान्याचे ७० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा पूर्णपणे धादांत खोटा आहे. मी अधिकृत आर्थिक आकडेवारी पडताळून पाहिली असून कारखाना दोन कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष नफ्यात सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक लोकशाही मार्गाने लढा, पण ती तथ्यांवर आधारित असावी. मतदारांची दिशाभूल करण्यासाठी खोटे आकडे फेकू नका. ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद पूर्णपणे जाणकार आहेत; त्यांना वास्तव काय आहे हे व्यवस्थित समजते. सत्य कधीही लपून राहत नाही, असा टोला जय पवार यांनी लगावला.

​सभासदांचे कल्याण हाच केंद्रबिंदू

​सोमेश्वर कारखाना हा शेतकऱ्यांच्या घाम आणि त्यागातून उभा राहिलेला गड आहे. त्यामुळे इथे वैयक्तिक कुरघोडी किंवा चिखलफेक न करता केवळ सभासदांचे आर्थिक हित, पारदर्शक कारभार आणि कारखान्याची प्रगती याच मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी, असे जय पवार म्हणाले. शेवटी कारखान्याचे भवितव्य सुरक्षित ठेवण्याचा योग्य कौल सुज्ञ सभासदच देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Next Post

दौंडच्या पूर्व भागात वनविभागाची धडक कारवाई ; बेकायदा माती उत्खनन करणारा हायवा जप्त,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group