• Contact us
  • About us
Saturday, October 17, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोमेश्वरच्या निवडणुकीचा सस्पेंस कायम; पवार विरुद्ध पवार होणार? की राष्ट्रवादीतच गटबाजीचा फटका बसणार? उद्या तीन वाजता अंतिम चित्र!

mahaanewslive by mahaanewslive
September 29, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
सोमेश्वरच्या निवडणुकीचा सस्पेंस कायम; पवार विरुद्ध पवार होणार? की राष्ट्रवादीतच गटबाजीचा फटका बसणार? उद्या तीन वाजता अंतिम चित्र!

बारामती : महान्यूज लाईव्ह

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीने आता निर्णायक वळण घेतले असून निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष रणधुमाळी रंगणार याचा अंतिम फैसला उद्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजता स्पष्ट होणार आहे. तब्बल ५१४ उमेदवारांचे अर्ज दाखल असल्याने निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र अद्याप प्रमुख राजकीय पक्षांनी अधिकृत पॅनेल जाहीर केलेले नसल्याने सोमेश्वरच्या राजकीय वर्तुळातील सस्पेंस कायम आहे. अर्ज माघारीसाठी उद्या केवळ चार तासांचा कालावधी असणार आहे. त्यामुळे या चार तासांत कोण माघार घेणार, कोण रिंगणात कायम राहणार आणि कोणत्या गटाकडून कोणाला अधिकृत उमेदवारी मिळणार यावर संपूर्ण निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे.

जगताप-काकडे संघर्षामुळे निवडणुकीला वेगळीच धार

सोमेश्वरच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि शेतकरी कृती समितीचे प्रमुख सतीश काकडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप- प्रत्यारोपांच्या फैरींमुळे गेल्या काही काळापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. दोन्ही बाजूंनी केलेल्या आरोप- प्रत्यारोपांमुळे कारखान्याच्या निवडणुकीला सुरुवातीलाच वेगळी राजकीय रंगत प्राप्त झाली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत यंदाच्या निवडणुकीत जगताप-काकडे समीकरण नेमके कोणत्या दिशेने जाते? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चांना वेग येत असताना दुसरीकडे गेल्या काही काळातील राजकीय संघर्षामुळे प्रत्यक्ष निवडणूक लागल्यास ही लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

काकडेंना संधी की पुन्हा प्रियराज मैदानात?

सतीश काकडे यांच्या उमेदवारीचा मुद्दाही यंदाच्या निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मागील निवडणुकीत सतीश काकडे यांचे चिरंजीव प्रियराज उर्फ अभिजित काकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा राष्ट्रवादीकडून सतीश काकडे यांना स्वतःला संधी मिळते की, पुन्हा त्यांच्या मुलाला प्रियराज उर्फ अभिजित काकडे यांना उमेदवारी दिली जाते याकडे आता सोमेश्वरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनी घेतल्या आहेत. त्यामुळे काकडे पिता-पुत्रांपैकी उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते याची उत्सुकता अधिकच वाढली आहे. काकडे यांना स्वतःला संधी मिळणार की मागील निवडणुकीतील उमेदवार प्रियराज उर्फ अभिजित काकडे यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवला जाणार या प्रश्नाचे उत्तर अधिकृत पॅनेल जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

दोन्ही राष्ट्रवादींसह भाजप-शिवसेनेचीही भूमिका गुलदस्त्यात..

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे इच्छुकांच्या हालचाली वाढल्या असून प्रत्येक गटाकडून आपापले राजकीय गणित जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनी घेतल्या आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार गटाकडून युगेंद्र पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. भाजपकडूनही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांची भूमिका आणि संभाव्य पॅनेल याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

५१४ अर्जांमुळे समीकरणे गुंतागुंतीची

यंदाच्या निवडणुकीत तब्बल ५१४ अर्ज दाखल झाल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र अंतिम रिंगणात किती उमेदवार राहतात हे अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे. पक्षीय पॅनेल निश्चित झाल्यानंतर काही इच्छुक माघार घेणार की काही जण बंडखोरी करत स्वतंत्रपणे मैदानात उतरणार आणि कोणत्या गटाची कोणासोबत राजकीय जुळवाजुळव होणार याकडे आता लक्ष लागले आहे.

बिनविरोधाची चर्चा की थेट राजकीय रणसंग्राम?

सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने काही राजकीय हालचाली होतात का याकडेही लक्ष आहे. मात्र दुसरीकडे जगताप-काकडे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची पार्श्वभूमी, विविध गटांची राजकीय ताकद आणि मोठ्या संख्येने दाखल झालेले अर्ज यामुळे प्रत्यक्ष निवडणूक लागल्यास सोमेश्वरच्या राजकारणात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे बिनविरोधासाठी पडद्यामागे चर्चा सुरू असल्या तरी प्रत्यक्षात कोणते समीकरण आकार घेते हे उद्याच स्पष्ट होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी या निमित्ताने एकत्र येणार का आणि जर आले नाहीत, तर पवार विरुद्ध पवार सामना होणार का? जर दोन्ही पवार एकत्र आले, तरी विजय शिवतारे आणि भाजपचा गट नेमकं काय करणार? असे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न या दहा तासात निर्माण झाले आहेत.

Next Post
बारामतीत अविष्कार ढोलेच्या मृत्यूची चर्चा; नेमकी आत्महत्या की घातपात? नेमकं कारण कधी येणार समोर?

शिरूर तालुक्यातील कारेगाव मध्ये गोळीबार ; एकाचा मृत्यू! एकाच महिन्यातील दुसरी घटना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group