• Contact us
  • About us
Friday, November 6, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फायनान्स कंपन्यांची दादागिरी चालणार नाही! हप्ता थकल्यास गाडी जप्त करण्यावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; जाणून घ्या तुमचा हक्क!

mahaanewslive by mahaanewslive
September 22, 2026
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, ताज्या बातम्या, Featured
0
पाटस पोलीस चौकीच्या हद्दीत दोन महिन्यात ५ ते ६ आत्महत्यांच्या घटना; तरुणांमधील आत्महत्येचे प्रमाण वाढल्याने चिंता!

बँक किंवा फायनान्स कंपनीचे कर्ज घेऊन वाहन घेणाऱ्यांची संख्या देशात प्रचंड आहे. अनेकदा काही कारणास्तव किंवा आर्थिक अडचणीमुळे कर्जाचा हप्ता भरला जात नाही. अशावेळी कंपन्या खासगी एजंटांमार्फत गाडी जप्त किंवा ओढून घेऊन जातात. अनेकदा हे एजंट कर्जदाराला धमकावतात, अवेळी फोन करतात किंवा मग मानसिक त्रास देत असल्याचेही समोर आले आहे. या सर्व बेकायदेशीर कारवायांविरुद्ध सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

बेकायदेशीरपणे गाडी जप्त केली जाऊ शकत नाही : सुप्रीम कोर्ट

हप्ता थकला म्हणून कोणत्याही वाहनधारकाची गाडी बळकावणे, मध्यरात्री किंवा बळाचा वापर करून जप्त केली जाऊ शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, कर्जदारांना कायदेशीर प्रक्रियेशिवाय त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही. यासोबतच रिझर्व्ह बँकेला या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण?

हरि दत्त शर्मा असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. त्यांनी टाटा एसएफसी ४०७ ट्रक घेण्यासाठी कर्ज चोला मंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेडकडून कर्ज घेतलं होतं. कर्जाचे हप्ते थकल्याने कंपनीच्या अनधिकृत एजंट्सनी ९ एप्रिल २०२३ रोजी पहाटे १ वाजता ट्रकचा स्टेअरिंग लॉक तोडून कोणतीही पूर्वसूचना न देता गाडी पळवून नेली. या ट्रकची अवघ्या ४.५ लाखांत विक्री करण्यात आली. या मनमानी कारभाराविरुद्ध पीडित ट्रक चालकाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत.

कर्ज वसूल करण्याचा अधिकार करारांतर्गत असला, तरी वसुलीसाठी बळाचा वापर किंवा मध्यरात्रीची स्टाईल चालणार नाही. न्यायालयाने चोला मंडलम कंपनीला याचिकाकर्त्याचे कर्ज खाते बंद करण्याचे, गाडी विकून मिळालेले ४.५ लाख रुपये ६% वार्षिक व्याजासह परत करण्याचे आणि मानसिक त्रास व रोजीरोटी हिरावून घेतल्याबद्दल १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ५०,००० रुपये खटला खर्चही ठोठावला आहे.

सध्या आरबीआयच्या मार्गदर्शक सूचना केवळ कागदावरच राहिल्या असून त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. बँका आणि एनबीएफसी नियमांचे पालन करत आहेत की नाही, हे पाहण्याची जबाबदारी आरबीआयची असल्याचे न्यायालयाने सुनावले. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार वसुलीसाठी अनाधिकृत एजंट्सचा वापर, दमदाटी किंवा बळजोरी करता येणार नाही. वाहन जप्त करण्यापूर्वी कायदेशीर प्रक्रिया आणि योग्य नोटीस देणे बंधनकारक आहे. कर्ज करारात वसुलीचे पारदर्शक नियम आणि नोटीस कालावधी नमूद असणे आवश्यक आहे.

Next Post
छत्रपती पुरुष गटाच्या अध्यक्षपदी  गणेश बागल व सचिवपदी प्रदीप नांदगुडे यांची निवड.

छत्रपती पुरुष गटाच्या अध्यक्षपदी  गणेश बागल व सचिवपदी प्रदीप नांदगुडे यांची निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group