• Contact us
  • About us
Saturday, October 17, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुपेत कसला ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प? बोगस शिबिर असल्याचा आरोप, मग आरटीओकडूनही तक्रार!

mahaanewslive by mahaanewslive
August 15, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, प्रवास, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
सुपेत कसला ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प? बोगस शिबिर असल्याचा आरोप, मग आरटीओकडूनही तक्रार!

सचिन पवार, सुपे
ग्रामपंचायत सुपे व शिवशक्ती सामाजिक सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनानिमित्त दि. १५ व १६ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय, सुपे येथे ड्रायव्हिंग लायसन्स शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, मात्र या शिबिराच्या माध्यमातून केवळ शिकाऊ परवानास नव्हे तर अधिकचे शुल्क घेऊन परवाना देण्याचा दावा केला होता. 

अर्थात विना परिक्षा लायसन्स काढून देण्याच्या नावाखाली आकारण्यात येणारे शुल्क व शिबिराची अधिकृतता याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, हे शिबिर बोगस असल्याचा आरोप नागरिकामार्फत झाल्यानंतर बारामतीच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने मात्र अधिकारी पाठवून शहानिशा केली तोपर्यंत संबंधित शिबिरातील संस्थाचालक पसार झाले होते.

या शिबीरासाठी तयार करण्यात आलेल्या एका पत्रकाआधारे दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, अवजड वाहन तसेच इतर वाहनांच्या परवान्यांसाठी वेगवेगळे दर नमूद करण्यात आले आहेत. काही प्रकारांसाठी तीन ते साडेसात हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाणार असल्याचे दिसले आहे. तसेच लर्निंग व पक्क्या परवान्यासाठी स्वतंत्र रक्कम नमूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सरकारी शुल्कापेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त रक्कम आकारली जात असल्याने या शिबीराविषयी साशंकता निर्माण झाली.

शिबिरासाठी आधारकार्ड आवश्यक असल्याचेही जाहिरातीत नमूद करण्यात आले असून, नागरिकांनी विविध संपर्क क्रमांकांवर नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचे अधिकार कोणत्या अधिकृत यंत्रणेला आहेत, संबंधित शिबिराला प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) मान्यता आहे का, तसेच नागरिकांकडून आकारण्यात येणारे शुल्क अधिकृत आहे का, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.

ग्रामपंचायतीच्या नावाचा वापर करून असे शिबिर आयोजित करण्यात आले असल्याने प्रशासनाने याची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शिबिर अधिकृत असल्यास संबंधित परवानगी व प्रक्रिया जाहीर करावी, तर बोगस असल्यास आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणीही पुढे येत आहे. या प्रकरणात बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एक तक्रार दाखल केली असून ग्रामपंचायत प्रशासनही काय भूमिका घेते, याकडे सुपेकरांचे लक्ष लागले आहे.

Next Post
स्वातंत्र्याच्या आठ दशकांनंतरही व्यवस्थेची लाजीरवाणी नांगी: एका पक्क्या रस्त्याअभावी झोळीतच विझला बाळासाहेबांचा श्वास!

स्वातंत्र्याच्या आठ दशकांनंतरही व्यवस्थेची लाजीरवाणी नांगी: एका पक्क्या रस्त्याअभावी झोळीतच विझला बाळासाहेबांचा श्वास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group