• Contact us
  • About us
Monday, October 19, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माळेगावमध्ये परिवर्तन करावेच लागेल – अजित पवार

Maha News Live by Maha News Live
February 14, 2020
in शेती शिवार, राजकीय, राज्य, पुणे
0
माळेगावमध्ये परिवर्तन करावेच लागेल – अजित पवार

बारामती : महान्युज लाईव्ह

सगळ्या निवडणूका आपण जिंकतो, आता माळेगाव हा पवारसाहेबांच्या विचाराचा कारखाना म्हणून भारतात ओळख आहे, त्यामुळे माळेगाव कारखाना कोणत्याही स्थितीत ताब्यात आलाच पाहिजे असा निर्धार करा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत केले.

राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनेलच्या निवडणूकीसंदर्भात आज पवार यांनी राष्ट्रवादी भवन येथे मेळावा घेतला. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले,लोकसभेच्या निवडणूकीला बहिण, मुलीच्या नात्याने सुप्रियाला प्रचंड मतांनी विजयी करता. त्याबद्दल धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच. आमदारकीत तर देशामध्ये उच्चांक केला, जिल्हा परीषदांमध्येही चांगले काम होते. सरकार नसताना सर्व जागा बारामतीत तुम्ही विक्रमी मताधिक्याने निवडून दिल्या. सगळ्या निवडणूका आपण जिंकतो. मत्र 1997 मध्ये एकदा आणि मागे पाच वर्षापूर्वी एकदा दुर्दैवाने आपण सर्वांना समाधानी करू शकलो नाही, म्हणून तिथे पराभव झाला. मतदारांचा तो अधिकार आहे, आता मात्र गाफिल राहू नका. हलक्या कानाचे राहू नका. अनेक जणांनी उमेदवारी मागितली, काही ठिकाणी संधी देता आली नाही. शेतकरी संघटना, वंचित आघाडी यांनाही सामावून घ्यावे लागले. निवडणूक झाल्यानंतर कारखान्याचा सहावा गट मंजूर करून मिळेल. सरकारनियुक्त तीन जागा व स्विकृत जागा एक आहे. ट्रस्टमधील जागा यामुळे दहा मध्ये जिथे म्हणून संधी देता येईल, तिथे देऊच, शिवाय ज्या गावांमध्ये निळकंठेश्वर पॅनेलला एकतर्फी मतदान मिळेल, तिथे संधी देऊ. निळकंठेश्वर पॅनेल निवडून आणा, दुसर्‍या दिवशी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पथक पाठवून विस्तारीकरणातील चुका शोधून दुरुस्त करू.

पवार पुढे म्हणाले,खरेतर आपण राज्यात सत्तेवर आहोत. मी ठरवले तर कायद्याच्या चौकटीत राहून काही गोष्टी करू शकतो. मात्र आम्ही खालच्या पातळीला जात नाही. सत्तेचा गैरवापर हा विरोधकांना संपविण्यासाठी करीत नाही. आपल्या येथे चांगली लोकशाही आहे. कोणीही आपली मते मांडू शकतात. मात्र असे असले तरी आज काही हट्टी माणसे आमचेच खरे असे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाव चांगला मिळाला असे सांगतात. भाव चांगला देताना बाळासाहेब तावरे यांनी सत्ता सोडताना आर्थिक स्थिती खूपच चांगली होती. आज मात्र माळेगावची स्थिती काय आहे? राष्ट्रवादीने प्रचारास सुरवात करून 224 रुपयांच्या मागे ठेवलेल्या दरावर आवाज उठवला, तेव्हा मग कुठे 224 रुपये देतो म्हणाले. गेटकेनला पैसे कमी देऊन सभासदांना अधिकचा दर देण्याची आवई त्यांनी दिली. वास्तविक पाहता गेटकेनमुळे ऊस उशीरा गाळप झाला, त्यामुळे टनेज घटले आणि उसाचा फटका बसला. मागील काळात निरा डाव्या कालव्याची भाजप सरकारने काय अवस्था केली, हे सर्वाना माहिती आहे. पाण्यासंदर्भात आता लगेच काही सांगत नाही. मात्र काळानुरुप कामे सुरू आहेत. ऊस उत्पादक सभासदांनी कष्टाने ऊस पिकवल्यानंतर चांगला कारखाना चालविण्याच्या दृष्टीने पॅनेल दिले आहे. आज राज्यात सरकार आपल्या विचारांचे आहे. समोरच्या पॅनेलने कितीही गप्पा मारल्या, तरीही प्रत्येक गोष्ट सहकार खात्याकडे येते. अडचणीचा काळ आहे, उद्या काहीही मदत करायची झाली, तर शासन निवडून येणार्‍या पॅनेलच्या विचाराचे असले की प्रश्न सहज सुटतात. महत्वाची गोष्ट म्हणजे माळेगावच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाला आपले शासन होते, तेव्हा प्रतियुनिट दराला 6.50 रुपयांचा करार केला. भाजपचे पाठीमागील पाच वर्षात राज्य होते, तर त्यांनी हा दर 4.24 रुपयांवर आणून ठेवला. तिथेच दोन रुपयांचा फटका बसला. आज माळेगावचा सहवीजनिर्मिती प्रकल्प चांगला चालत नाही. आपल्या विरोधी पॅनेलमधील लोकांनी कारखान्याला राष्ट्रवादीचे संचालक मंडळ कर्जबाजारी करताहेत म्हणून सहवीजनिर्मितीला विरोध केला. मात्र त्यांनी सत्तेवर येताच तोच सहवीजनिर्मिती प्रकल्प पुढे नेला. त्यांनी हट्टापायी विस्तारवाढ केली. तरी देखील मागील वर्षी हंगाम बंद होताना व आता चालू होताना काय स्थिती झाली हे सर्वांना माहिती आहे. विस्तारवाढ होताना ती नीटनेटकी झाली पाहिजे. पण चांगल्या पुरवठादारांकडून चांगल्या दर्जाची मशीनरी घेतली नाही. एकूणच माळेगाव कारखान्याचे विस्तारीकरण व अधुनिकीकरण फसले आहे.

  • मी खासगी कारखानदारीचा पुरस्कर्ता कसा?

मी खासगी कारखानदारीचा पुरस्कर्ता आहे असा आरोप करतात. मात्र विलासराव देशमुखांच्या काळात सहकारी कारखान्याला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून हा निर्णय बदललेला नाही. म्हणून खासगी कारखाने निघाले. मी खासगी कारखान्यांचा पुरस्कर्ता कसा असेल? छत्रपतीच नाही, तर इंदापूर तालुक्यातील तीनपैकी छत्रपती जरा बर्‍यापैकी तरी आहे. इंदापूर कारखाना 9 हजार टनाने चालणारा आज 2 हजाराने चालतो. निरा-भिमाचे रिपोर्टही देत नाहीत. आम्ही गवगवा करीत नाही. मात्र जी जबाबदारी पार पाडतो. आज आम्ही मंत्रीमंडळातील बहुतेक जण साखर कारखानदारीशी संबंधित आहोत. तिथे काहीही विषय आला आणि साखर कारखानदारीविरोधातील मुद्दा आला, तर आम्ही तिथे विरोध करतो. पाठीमागील पाच वर्षात असे कधी घडले नाही. उर्जामंत्री, मुख्यमंत्री, अर्थमंत्री साखरेशी संबंधित नसणारे होते. मी सोमेश्वरच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहे. आता सतत भाव देण्यासाठी बँकांकडे जायला लागू नये म्हणून स्वतःचा निधी तयार करून ठेवला आहे. कोणत्याही समस्येला सामोरे जाण्यासाठी तेथील परिस्थिती चांगली आहे. माळेगावमध्ये तसे आहे का याचा विचार करा.

अडीच हजारांनी पॅनेल निवडून द्या
पवार म्हणाले,` माळेगावच्या कार्यक्षेत्रातील सभासदांनी व सर्व गावांनी एकमताने मताधिक्य देऊन पॅनेल विजयी करा. एकजूठ दाखवून हे पॅनेल अडीच हजारांनी निवडून आले पाहिजे. गेल्या पाच वर्षात पवारसाहेब या कारखान्यावर गेलेले नाहीत. त्यांना या कारखान्यावर सन्मानाने न्यायचे आहे. ती जबाबदारी सर्वांची आहे आणि या कारखान्यातील सर्व त्रुटी दुरूस्त करायच्या आहेत, त्यासाठी हे पॅनेल प्रचंड मताधिक्याने निवडून द्या.`

Tags: Ajit PawarElection2020Malegaon Karkhana Elections NCPNilkantheshwar Panel
Next Post
बुडव्यांनी लावला देशातील बॅंकांना सव्वा लाख कोटींचा चुना

बुडव्यांनी लावला देशातील बॅंकांना सव्वा लाख कोटींचा चुना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group