दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू करण्याच्या मागणीसाठी उद्या रविवारी (ता. 11 ) माजी आमदार व पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या नेतृवाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.अशी माहिती राष्ट्रवादी कॅाग्रेसचे दौंड तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी दिली.
दौंड तालुक्यामध्ये ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. भीमा पाटसचा चालू हंगाम सुरु करणेबाबत व्यवस्थापनाकडून अद्याप कुठल्याही प्रकारे हालचाली दिसत नाहीत. जिल्हयातील इतर कारखाने येत्या काही दिवसातच सुरु होत आहे.
मात्र तालुक्यातील शेतकरी सभासदांचा ऊस गाळप होण्यासाठी भीमा पाटस सहकारी काऱखाना हा एकमेव सहकारी हक्काचा कारखाना आहे. तो पुर्ण क्षमतेने सुरु करण्यात यावा व कामगारांची थकित पगाराची देणी ताबड़तोब देण्यात यावी.
या सर्व मागण्यांसाठी रविवार ( दि.११ ) सकाळी दहा वाजता कारखाना (मधुकरनगर, पाटस) कार्यस्थळवर आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती पवार यांनी दिली.











