• Contact us
  • About us
Friday, June 19, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१९ जूनपूर्वी भीमा-पाटस कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू करा! मुंबई उच्च न्यायालयाचे कडक आदेश! मंत्र्यांच्या स्थगितीवर ताशेरे!

mahaanewslive by mahaanewslive
June 12, 2026
in सामाजिक, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
१९ जूनपूर्वी भीमा-पाटस कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू करा! मुंबई उच्च न्यायालयाचे कडक आदेश! मंत्र्यांच्या स्थगितीवर ताशेरे!

राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह

दौंड : दौंड तालुक्यातील एकमेव सहकारी असलेल्या भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक आणि प्रशासकीय नेमणुकीच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णय दिला आहे. सहकार मंत्र्यांनी प्रशासकीय समितीची नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत न्यायालयाने तो “अशोभनीय” असल्याचे म्हटले आहे.

याचिकाकर्ते वसंतराव साळुंखे यांनी सहकार मंत्र्यांच्या २४ व २९ एप्रिल २०२६ च्या अंतरिम आदेशांना उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, त्यानंतर ७ मे २०२६ रोजी मंत्र्यांनी अंतिम आदेश देत प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी केलेली प्रशासकीय समितीची नियुक्ती रद्द केली.

उच्च न्यायालयाची निरीक्षणे व मंत्र्यांवर ताशेरे.. प्रतिवादींच्या वकिलांनी याचिकाकर्त्यांना आव्हान देण्याचा अधिकार नाही असा आक्षेप घेतला. मात्र न्यायालयाने तो “हास्यास्पद” आणि “निराधार” ठरवत फेटाळला. पूर्वी नियुक्ती झाल्याने त्यांना कायदेशीर दर्जा असल्याचे स्पष्ट केले. तसेच मंत्र्यांनी आदेश रद्द करताना याचिकाकर्त्यांची पात्रता तपासली नाही. तसेच “तक्रार करणाऱ्यांनाच प्रशासकीय समितीवर घेतले” हे कारणही न्यायालयाने अमान्य केले.

केवळ तक्रार केली म्हणून कोणी अपात्र ठरत नाही, असे याचिकाकर्त्यांचे वकील संजीव पी. कदम यांनी निदर्शनास आणले. याचिकाकर्ते अपात्र आहेत असा ठोस निष्कर्ष मंत्र्यांनी कुठेही नोंदवला नाही. केवळ अस्पष्ट कारणांवर आदेश पारित करताना मंत्र्यांनी अधिकारांचा वापर “अत्यंत लज्जास्पद (अशोभनीय)” पद्धतीने केल्याचे न्यायालयाने म्हटले.

न्यायालयाच्या आदेशानंतर १२ मे रोजी प्रशासकाची नियुक्ती झाली, पण त्यांनी दुसऱ्याच दिवशी काम करण्यास असमर्थता दर्शवली. यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत “निवडणुका घेण्याची जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्याच्या वर्तनाचे आम्ही कौतुक करत नाही” असे स्पष्ट शब्दांत सुनावले.

उच्च न्यायालयाचे ४ कडक निर्देश
१० जून २०२६ रोजी न्यायालयाने पुढील आदेश दिले आहेत: प्रशासक नेमणूक : प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी १२ जून २०२६ पूर्वी कोणत्याही गटाशी संबंधित नसलेल्या विशेष लेखापरीक्षकाची प्रशासक म्हणून नेमणूक करावी. निवडणूक निधी : लीजधारक मे. साई प्रिया शुगर प्रा. लि., जमखंडी यांनी ४०,११,४७५ रुपये निवडणूक निधी १७ जून २०२६ पूर्वी सहसंचालकांकडे जमा करावा.

मतदार यादी : कारखान्याच्या प्रभारी MD नी अद्ययावत मतदार यादी १६ जून २०२६ पूर्वी द्यावी. निवडणूक प्रक्रिया : नियुक्त प्रशासकाने १९ जून २०२६ पूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू करावी. कारखान्याच्या निवडणूक विलंबाबाबत याचिकाकर्त्यांनी व्यक्त केलेला ‘जाणूनबुजून विलंब’ करण्याचा संशय न्यायालयाने पूर्णपणे नाकारलेला नाही. या सर्व आदेशांच्या अनुपालनासाठी प्रकरण २२ जून २०२६ रोजी पुन्हा सुनावणीस ठेवले आहे.

दरम्यान, हा निर्णय पुन्हा एकदा भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याच्या सध्याच्या संचालक मंडळाला धक्का मानला जात आहे. न्यायालयाने थेट हस्तक्षेप करत प्रशासनाला कडक शब्दांत सुनावले असून, पुढील काही दिवसांत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली नाही तर संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे . त्यामुळे भीमा पाटस कारखान्याचा सत्तासंघर्ष आता निर्णायक वळणावर आला आहे. १९ जूनपूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Next Post
स्वप्न अजितदादांचे.. संकल्प सुनेत्रा पवारांचा; कटफळमध्ये उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल!

स्वप्न अजितदादांचे.. संकल्प सुनेत्रा पवारांचा; कटफळमध्ये उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

June 18, 2026
माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

June 18, 2026
एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

June 18, 2026
दौंड पुन्हा हादरले! गर्भपात प्रकरणात केडगावच्या डॉ. स्वाती लवंगारे यांच्यावर गुन्हा दाखल!

बेकायदेशीर लिंग निदान व गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिला डॉक्टरला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी!

June 18, 2026
थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

June 18, 2026
बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

June 18, 2026
अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

June 17, 2026
भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

June 17, 2026
बारामती शहर पोलिसांची गोवंश वाहतुकीवर धडक कारवाई; दोन पिकअपसह चार जनावरे ताब्यात

गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या.. गोमातेची हत्या रोखा आणि म्हैस, रेड्याच्या मांसावरून होणारी तथाकथित ब्लॅकमेलिंगही रोखा..  बारामतीत कुरेशींचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन!

June 17, 2026
महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

June 17, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group