• Contact us
  • About us
Saturday, October 31, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अवकाळी पाऊस-गारपिटीने बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात हाहाकार; कृषी विज्ञान केंद्र व शेती तज्ञांनी केली पाहणी! केळी, पेरू, भाजीपाला पिकांचे कोट्यवधींचे नुकसान!

mahaanewslive by mahaanewslive
June 1, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
अवकाळी पाऊस-गारपिटीने बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात हाहाकार; कृषी विज्ञान केंद्र व शेती तज्ञांनी केली पाहणी! केळी, पेरू, भाजीपाला पिकांचे कोट्यवधींचे नुकसान!


बारामती, दि. १ जून : बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ३१ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वडगाव निंबाळकर, कोराळे बुद्रुक, थोपटेवाडी, मासाळवाडी, होळ, सदोबाचीवाडी, सस्तेवाडी आदी गावांतील केळी, डाळिंब, पेरू, वांगी, आंबा, कोथिंबीर, ऊस व चारा पिकांना मोठा फटका बसला आहे.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे तज्ज्ञ, कृषी विभाग व महसूल विभागाचे अधिकारी आज प्रत्यक्ष शेतात पोहोचले. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीचा आढावा घेतला असून शासनाच्या मदतीसाठी पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

केळीची १० एकर बाग भुईसपाट
वडगाव निंबाळकर येथील प्रगतिशील शेतकरी अभिषेक अनिलकुमार शहा यांची १० एकरांवरील केळीची बाग वादळी वारे आणि गारपिटीमुळे अक्षरशः भुईसपाट झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून केळीचे दर घसरून २ रुपये किलोपर्यंत आले होते. आता दर ३४ रुपये किलोपर्यंत पोहोचत असतानाच निसर्गाच्या तडाख्याने त्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. त्यांच्या ६ एकरांवरील लाल पेरू बागेलाही मोठा फटका बसला असून फळांची गुणवत्ता घसरल्याने व्यापाऱ्यांकडून खरेदीबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

शेडनेट कोसळले, लाखोंचे नुकसान
सस्तेवाडी येथील नितीन कदम यांचे एक एकरावरील ढोबळी मिरचीचे शेडनेट गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे कोलमडले. पहिल्या तोड्याला ६० रुपये किलो दर मिळाला होता आणि सुमारे ४० टन उत्पादनाची अपेक्षा असताना संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले. याच गावातील किशोर कदम यांची अर्धा एकर काकडी आणि एक एकर कोथिंबीरही पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली आहे.

वांग्याचे पीकही उद्ध्वस्त
सदोबाचीवाडी येथील ऋषिकेश धुमाळ यांच्या सव्वा एकरावरील अगोरा वांगी पिकाची पाने, फुले आणि फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली आहेत. तसेच परिसरातील ऊस पिकांनाही गारांच्या माऱ्याचा फटका बसून पिकांवर ताण निर्माण झाला आहे.

तातडीने पंचनामे सुरू..
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना कृषी विज्ञान केंद्राचे संतोष गोडसे, सर्कल अधिकारी गजानन पारवे, तालुका कृषी अधिकारी हाके, ग्रामविकास अधिकारी किरण राधवे, सहाय्यक कृषी अधिकारी मिथुन बोराटे, केव्हीकेचे प्राफुल्ल पोट व विजय मदने, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पवार तसेच सरपंच सुनील ढोले उपस्थित होते.

शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांचा सल्ला
कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेतातील साचलेल्या पाण्याचा निचरा करणे, फळबागांतील मोडलेल्या फांद्यांची छाटणी करणे, खराब फळे नष्ट करणे, बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी करणे तसेच ऊस पिकासाठी योग्य व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला आहे.

सदोबाची वाडी येथील श्री. ऋषिकेश धुमाळ यांचे सव्वा एकर वरील अगोरा वांगी याचे पूर्ण पाने, फुले, फळे गळून गेली आहेत. या सर्व गावातील ऊस पिकाची पाने व इतर सर्व पिकांना या पावसाने व गारांच्या माऱ्याने शॉक बसला आहे. कृषी विज्ञान केंद्र मार्फत श्री. संतोष गोडसे, महसूल विभाग मार्फत सर्कल अधिकारी श्री. गजानन पारवे, कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी श्री. हाके साहेब, वडगावचे ग्रामविकास अधिकारी श्री. किरण राधवे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. मिथुन बोराटे, केव्हीके चे श्री. प्राफुल्ल पोट, श्री. विजय मदने पंचायत समिती सदस्य श्री. जितेंद्र पवार, वडगावचे सरपंच श्री. सुनील ढोले उपस्थित होते.

उपायोजना करा

शेतातील साठलेल्या पाण्याचा निचरा करावा. उताराला समांतर चारी काढाव्यात व जमिनीत पाणी साठून राहिलेले असल्यास ते चर काढून निचरा करावे. फळबागेतील नुकसानीची पातळी कमी करण्यासाठी पेरू, सिताफळ, आंबा बागेतील मोडलेल्या फांद्या छाटणी करून घ्याव्यात व छाटलेल्या भागावर १% बोर्डो पेस्ट लावावी.

खराब झालेली फळे गोळा करून नष्ट करावीत. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ओलावा जास्त प्रमाणात राहत असेल त्यांनी शेतामध्ये ट्रायकोडर्मा 4 किलो + सुडोमोनस 4 किलो प्रति एकर द्यावे जेणेकरून जमिनीतून उद्भवणाऱ्या मर रोगाचे नियंत्रण करता येईल. नुकसानग्रस्त पीक भागावर कीटकनाशक व बुरशीनाशक फवारणी करून घ्यावे. फवारणीसाठी कार्बेन्डेझिम बुरशीनाशक 1 ग्रॅम + इमिडाक्लोबप्रीड 17.8% SL कीटकनाशक 0.4 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे पिकावर सकाळच्या वेळेस फवारणी करावी.

साधारण आठ ते दहा महिने वय असलेल्या ऊसाला शक्य असेल तिथे पाचटीने बेटे बांधणी करावीत जेणेकरून हवा खेळती राहील व जमिनीत वाफसा राहील. याशिवाय ड्रिप मधून मुळांच्या वाढी व संख्या वाढण्यासाठी ह्युमिक ऍसिड 1 किलो + 12: 61: 00 प्रति एकर ड्रिपमधून 15 दिवसाच्या अंतराने दोन वेळा द्यावे. पिक कालावधी संपलेल्या प्लॉटची स्वच्छता करून घ्यावी, वाफसा पाहून मशागत करावी व खरीप हंगाम लागवडीसाठी क्षेत्र तयार करून ठेवावे. सध्याच्या उपलब्ध हवामान अंदाजानुसार पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

नुकसानाची माहिती तातडीने द्या

कृषी विभागाने आवाहन केले आहे की, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे फोटो काढून त्वरित विमा कंपनीचे प्रतिनिधी, कृषी विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, जेणेकरून मदत आणि विमा दाव्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकेल. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस मेघगर्जना, वादळी वारे आणि पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Next Post
वयाच्या 48 व्या वर्षीही ताकदीचा दमदार ठसा; बारामतीच्या आरती एकाडपाटील यांचे राज्यस्तरीय सुवर्णयश

वयाच्या 48 व्या वर्षीही ताकदीचा दमदार ठसा; बारामतीच्या आरती एकाडपाटील यांचे राज्यस्तरीय सुवर्णयश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group