• Contact us
  • About us
Saturday, October 31, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नीरा कॅनलमध्ये उडी मारलेल्या तरुणीला मिळाले जीवदान; धाडसी युवकांच्या प्रसंगावधानाने टळली दुर्घटना!

mahaanewslive by mahaanewslive
June 1, 2026
in सामाजिक, सुरक्षा, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
नीरा कॅनलमध्ये उडी मारलेल्या तरुणीला मिळाले जीवदान; धाडसी युवकांच्या प्रसंगावधानाने टळली दुर्घटना!

विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : बारामती शहरातील क्रीडा संकुलासमोरील नीरा कॅनलमध्ये रविवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत धाडसी युवकांच्या प्रसंगावधानामुळे एका तरुणीचे प्राण वाचले.वाहत्या पाण्याच्या कॅनलमध्ये उडी मारलेल्या तरुणीला वेळेत बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली असून या युवकांच्या धाडसाचे बारामती परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

रविवारी दुपारच्या सुमारास क्रीडा संकुल परिसरात नेहमीप्रमाणे नागरिकांची वर्दळ सुरू असताना अचानक एका तरुणीने नीरा कॅनलमध्ये उडी मारल्याची घटना घडली. कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने आणि पाण्याचा वेगही अधिक असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अनेक नागरिक घटनास्थळी जमा झाले. मात्र काही क्षणांसाठी उपस्थित नागरिकांनाही काय करावे हे सुचत नव्हते.

अशा गंभीर परिस्थितीत शिवराज शरद झांबरे आणि प्रेम अभिजीत काळे या दोन युवकांनी धाडस दाखवत क्षणाचाही विलंब न करता कॅनलमध्ये उडी घेतली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी पाण्यात झुंज देत तरुणीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा वेग, खोली आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता हे काम अत्यंत धोकादायक होते.

मात्र दोघांनीही धैर्याने परिस्थितीचा सामना करत पाण्याबाहेर काढले. त्यानंतर या मुलीला उपचारासाठी दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्यात आले. याचवेळी विशाल जाधव, संजय घोरपडे तसेच इतर उपस्थित नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेतली. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे तरुणीला सुरक्षितरित्या पाण्याबाहेर काढण्यात यश आले.

वेळेत मदत मिळाल्यामुळे तिचे प्राण वाचले असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र युवकांच्या धाडसामुळे संभाव्य अनर्थ टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. आजच्या काळात अनेकजण संकटाच्या प्रसंगी केवळ प्रेक्षकाची भूमिका घेताना दिसतात. मात्र शिवराज झांबरे, प्रेम काळे तसेच मदतीसाठी धावून आलेल्या विशाल जाधव, संजय घोरपडे आणि इतर नागरिकांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी ही प्रेरणादायी ठरली आहे. त्यांच्या या साहसी कृतीमुळे एका तरुणीला नवजीवन मिळाले असून बारामतीकरांकडून या सर्वांचे कौतुक केले जात आहे.

Next Post
अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणीचा कुटील डाव हाणून पाडणार! चर्मकार समाजाचा आळंदी येथील बैठकीत एल्गार !

अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणीचा कुटील डाव हाणून पाडणार! चर्मकार समाजाचा आळंदी येथील बैठकीत एल्गार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group