दौंड : महान्यूज लाईव्ह
भारतीय जनता पक्षाचे जिल्हा निमंत्रक कार्यकारी सदस्य, माजी जिल्हा सरचिटणीस व दौंड भाजप नेता तानाजी संभाजी दिवेकर याच्यासह चार जणांना विनयभंग केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी आज अटक केली
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, तानाजी संभाजी दिवेकर यांच्यासह मालन तानाजी दिवेकर, पंकज तानाजी दिवेकर, मंदार तानाजी दिवेकर ( सर्व रा.वरवंड ता.दौंड.जि.पुणे. ) यांना अटक केलेली आहे. तानाजी दिवेकर याने सुनेला तुझ्या वडीलांच्या नावावर असलेला जनावरांचा गोठा तु्झ्या नावावर कर आणि तुझ्या नावावर करून ते माझ्या नावावर कर मला त्याच्यावर कर्ज काढायचे आहे. आणि मला तुझ्या लग्नात झालेल्या सर्व खर्च परत दे असा तगादा लावत शिवागीळ,दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग केला होता.
पती, दिर, सासु हे मानसिक व शारीरीक छळ करीत असल्याची फिर्याद पंकजच्या पत्नीने यवत पोलीस स्टेशनला दिली होती.
पंकज याच्या पत्नीच्या फिर्यादीवरून यवत पोलीस स्टेशनला सोमवारी (ता.5 ) रात्री उशीरा तानाजी दिवेकर यांच्यावर विनयभंगासह शारीरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तानाजी दिवेकर यांच्यासह पत्नी व दोन मुलांवर यांना बुधवारी (ता. ७) अटक केली आहे.











