नागपूर : महान्युज लाईव्ह
डिसेंबर महिन्यात नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यासाठी विधिमंडळ कर्मचारी वसाहतीमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांना खोल्या खाली करण्याची नोटीस सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाठवण्यात आली आहे.
परंतु कोरोना संक्रमणामुळे या कुटुंबांना बाहेर कोणीही भाड्याने घर द्यायला तयार नाही. त्यामुळे या कुटुंबियांवर ‘कुणी घर देता का घर’ असं म्हणण्याची वेळ आली आहे.
विधिमंडळ कर्मचारी वसाहतीतील 160 खोल्यांच्या गाळ्यामध्ये इतर विभागातील कर्मचारी राहतात. दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मुंबईमधून येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी या खोल्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांना काही काळ दुसरीकडे राहण्यास सांगितले जाते.
त्यानुसार दरवर्षी येथे राहणारी कुटुंबं अधिवेशनाच्या काळात दुसरीकडे घर भाड्याने घेतात आणि तिथे राहतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे या कर्मचाऱ्यांना बाहेर कुणीही घर भाड्याने द्यायला तयार नाही.










