किशोर भोईटे: महान्यूज लाईव्ह
तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण आंतर शालेय नाट्य स्पर्धा 22- 23 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती श्री छत्रपती हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य रमेश मचाले यांनी दिली. पुणे जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग डायट पुणे व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा श्री छत्रपती हायस्कूल भवानीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक, खाजगी प्राथमिक, माध्यमिक व माध्यमिक विद्यालयांनी आपल्या प्रवेशिका शाळेच्या पत्रावर गटनिहाय 19 डिसेंबरपर्यंत विद्यालयात पोहोच कराव्यात. यावर्षी मुले व मुली एकत्रित असा एक नवीन गट सर्व गटांसाठी करण्यात आला आहे.
या नाट्य स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी केंद्रप्रमुख तथा प्राचार्य रमेश मचाले यांच्याशी 9284400217 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.