दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मोरे यांचा कोरोना विषाणू चा खासगी रूग्णालयातील प्रयोग शाळेतील अहवाल हा पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली. यामुळे दौंड पंचायत समिती सह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मोरे हे कोरोना या महाभयंकर रोगाच्या पार्श्वभूमीवर मागील सहा महिन्यापासून दौंड तालुक्यात कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीशी समन्वय साधत त्यांनी तालुक्यात प्रत्यक्षात जावून कोरोना बाधीत गावांची पहाणी करीत जनजागृती केली होती.
दरम्यान, गटविकास विकास अधिकारी गणेश मोरे हे त्यांच्या आई आजारी असल्याने पंढरपूर येथे गेले होते. त्यांच्या आईंनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गणेश मोरे यांचीही तपासणी केली. त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.










