महान्यूज वेदर अपडेट
राज्यात रविवारपासून पुन्हा पावसाला सुरवात झालेली असतानाच हवामान खात्याने नव्याने दिलेल्या हवामान अंदाजानुसार येत्या चार दिवसांत पुणे जिल्ह्यासह मुंबई, कोकण, पूर्व विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
रविवारी राज्याच्या काही भागात पाऊस पडला. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्याच्या भागासह नाशिक, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, पालघर आदी जिल्ह्यात तुरळक ते मुसळधार पाऊस झाल्याची नोंद आहे.
आता नव्याने जारी केलेल्या अंदाजानुसार पुन्हा पुढचे चार दिवस मुसळधार ते अतिवृष्टीचे आहेत. यामध्ये कोकण, मध्यमहाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे.