बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत कोरोनाने २४ वा बळी घेतला आहे. पुण्यात उपचार घेत असलेल्या प्रतिष्ठित व्यापाऱ्याचा आज दुपारी मृत्यू झाला आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात व्यावसायिक जबाबदारी पार पाडत असतानाच सामाजिक उपक्रमांमध्येही सहभागी झालेल्या या व्यापाऱ्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
बारामती शहरातील अशोकनगर येथे वास्तव्यास असलेल्या या व्यापाऱ्यासह त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली होती. या व्यापाऱ्यावर पुण्यात, तर त्यांच्या पत्नीवर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी या व्यापाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे बारामतीतील कोरोना बळींची संख्या २४ वर पोहोचली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या कालावधीत बारामतीतील विविध सामाजिक कामात हिरीरीने सहभाग घेत संकट काळात हातभार लावणाऱ्या या व्यापाऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.










