बारामती : महान्यूज लाईव्ह
संत श्री सोपानकाका महाराज यांच्या पालखीला मेंढ्यांनी रिंगण केले. सोपानकांच्या पालखीला या भागात मेंढ्या रिंगण मारतात.
बारामती तालुक्यातील मुक्काम आटोपून संत सोपानकांचा पालखी सोहळा आज इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील मुक्कामाकडे निघाला असता पिंपळी येथे संत सोपान काका महाराज यांच्या पालखीला मेंढ्यांचे रिंगण सोहळा पार पडला.
पिंपळी या गावात पालखी सोहळा न्याहारीसाठी विसावला, यावेळी गावात पालखी दाखल झाल्यानंतर पालखीला मेंढ्यांच्या रिंगणाची परंपरा आहे. त्यानुसार यावेळी मेंढ्यांचे रिंगण पार पडले. हे मेंढ्यांचे रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
रिंगण सोहळा झाल्यानंतर पालखी ही इंदापूरच्या दिशेने प्रस्थान करून आज लासुर्णे येथे सोपानकाका महाराज पालखीचा मुक्काम असणार आहे.