आरोग्य संदेश प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर डे निमित्त आरोग्य विषयक कार्यशाळा
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : मानवी शरीरात दुर्धर विकार टाळण्यासाठी अल्कलाईन आयोनाईजड पाणी पिणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ व अकलूज आयएमए चे संस्थापक डॉ.एम.के. इनामदार यांनी केले.
इंदापूर इंडीयन मेडीकल असोसिएशन, होमिओ पॅथिक व आयुर्वेदिक असोसिएशन, पुणे योद्धा ग्रुप, समाजभूषण शरद कुमार माणिकचंद शहा चॅरिटेबल ट्रस्ट, आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त जल है तो कल है, आपल्या आरोग्याचे शिल्पकार आपणच या विषयावर आयोजित कार्यशाळेत डॉ. एम. के. इनामदार बोलत होते.
यावेळी डॉ. इनामदार यांचा इंडीयन मेडीकल असोसिएशनचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. राम आरणकर, तालुकाध्यक्ष डॉ.अविनाश पाणबुडे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. डॉ.इनामदार यांचे लक्षवेधी कार्य पहाता सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करावा, अशी मागणी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.श्रेणिक शहा यांनी केली.
डॉ. इनामदार पुढे म्हणाले, आपणा सर्वांचे जगायचे वय ६५ ते ७५ झाले आहे. त्यास हवा, पाणी व अन्न यामधील प्रदूषण, व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार व ताणतणावाची जीवन पद्धत कारणीभूत आहे. मानवी शरीरात ७२ टक्के पाणी तर २८ टक्के अन्न आहे. आपण चांगले अन्न खाण्याकडे लक्ष देतो मात्र चांगले पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपण अल्कलाईन पाणी पिण्यास सुरुवात केल्यास आपले अनेक आजार बरे होण्यास मदत होवून आपले जीवन निरोगी व दीर्घायुषी होईल.
यावेळी डॉ.अविनाश पाणबुडे म्हणाले, महामार्गावरील इंदापूर हे मेडीकल हब म्हणून पुढे येत असल्याने सर्व डॉक्टरांनी एकत्रित सुसज्ज आरोग्य सुविधा देणे गरजेचे आहे.
यावेळी डॉ. संजय देशमुख, डॉ. उदय अजोतीकर, डॉ. श्रेणिक शहा, डॉ.संजय शहा, डॉ.समीर मगर, डॉ.अनिल शिर्के, डॉ.अतुल वणवे, डॉ.सचिन बिचकुले, डॉ.नामदेव गार्डे, डॉ.अभिजित ठोंबरे, डॉ.रोहित कांडलकर, डॉ. सागर दोशी, डॉ. अर्जुन नरुटे, डॉ. उदय कुरूडकर, डॉ. उदय फडतरे, डॉ. शैलेश घोगरे, डॉ. दर्शन दोशी, डॉ. सूर्यकांत बनसुडे, डॉ.सचिन बाबर, डॉ.रियाज पठाण, डॉ. मधुकर राऊत, डॉ.निलेश कुंभार, डॉ. लक्ष्मण सपकळ, डॉ. कल्पना खाडे या डॉक्टरांचा देवदूत सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी इंदापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष नरेंद्र गांधी, भारतीय जैन संघटनेचे इंदापूर शहराध्यक्ष धरमचंद लोढा, सामाजिक कार्यकर्ते कमलेश शहा, गणेश जाधव, नवनाथ रूपनवर, पंकज तांबोळी, गौरव मखरे, धनंजय कुंभार उपस्थित होते.
दरम्यान शतकवीर अमोल चिवरे यांनी केंगन अल्कलाईन वॉटर सयंत्र, पाणी व त्याचे औषधी गुणधर्म याचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले तर डॉ. जय शहा यांनी कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी फेल्यूअर व इतर दुर्धर आजारावर अल्कलाईन पाण्याचा उपयोग याबाबत सप्रमाण माहिती दिली.
स्वागत डॉ. राधिका शहा, श्री. काळे, महेश निंबाळकर यांनी केले. प्रास्ताविक व सूत्र संचालन डॉ. संदेश शहा यांनी केले. आभार डॉ. श्राविका शहा यांनी मानले.