इंदापूर : महान्युज लाईव्ह
बारामती मध्ये उपचार घेत असलेल्या व बारामतीत तपासणी झालेल्या दोघा जणांना कोरोनाची बाधा झाली असून टेस्टमध्ये सणसर, भवानीनगर व अंथुर्णे येथील रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर उदमाईवाडी येथील रुग्णाचा ही अहवाल पॉझिटिव्ह आला होता परंतु या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
इंदापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसात 22 रुग्ण कोरोना बाधित आढळून आल्यानंतर आज बारामतीतील रॅपिड टेस्ट मध्ये इंदापूर तालुक्यातील तिघेजण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये सणसर येथील सत्तर वर्षीय पुरुष रुग्णास कोरोनाची लागण झाली असून सध्या ते बारामतीत उपचार घेत आहेत. भवानीनगर येथेही ही एका रुग्णास करणाची लागण झाली असून अंथुर्णे येथील 32 वर्षीय पुरूष रूग्णास कोरोनाची लागण झाली आहे. उदमाईवाडी येथील रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला.
इंदापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसात दोघा जणांचा मृत्यू झाला असून 25 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या आता 308 झाली असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे.











