दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील हातवळण भागात बिबट्यानी धुमाकुळ घातला आहे. एका शेतकऱयांच्या दोन शेळ्यावर बिबट्यांनी हल्ला करून त्या फस्त केल्याची घटना नुकतीच घडली आहे. वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून जेरंद करावा अशी मागणी वनसंरक्षक समितीचे अध्यक्ष मंगेश फडके यांनी केली आहे.
दौंड तालुक्यात मध्यंतरी हातवळण, कडेठाण, कानगाव, पाटस, कुसेगाव, पारगाव तसेच राहु परिसरात मागील काही अनेक वर्षापासून बिबट्याचा वावर आहे. शेतकरांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करण्याच्या घटना ही घडल्या आहेत. मागील काही दिवसापासून शांत असलेल्या बिबट्याने पुन्हा एकदा हातवळण परिसरात धुमाकुळ घातला आहे. काल हातवळण येथील श्रीकांत भालचंद्र शिंदे यांच्या वस्तीवर हल्ला करून दोन शेळ्यांची शिकार केली आहे. शेतकऱ्यांच्या गाई, वासरे,बकरी, शेळ्या व इतर पाळीव जनांवरे सुरक्षित नसल्याने परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दौंड तालुका वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारांनी या भागात बिबट्याचा वावर लक्षात घेवून तातडीने पिंजरा लावून तो जेरबंद करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. दरम्यान शेतात काम करणारे शेतकरी महिला व मजूरांनी शेतात काम करताना आजबाजूला लक्ष देवून काम करावे व वाड्या वस्त्यांवरील नागरीकांनी सर्तक रहावे आपली पाळी जनावरे, शेळ्या, गाई वासरे, बकरी रात्रीच्या वेळी सुरक्षित ठिकाणी बांधावीत, घाबरून न जाता काळजी घ्यावी. बिबट्या निदर्शनास आला तर त्वरीत वनविभागाची संपर्क करावा असे आव्हान वनसंरक्षक समितीने केले आहे.











