दौंड : महान्यूज लाईव्ह
तालुक्यातील ग्रामीण भागात दहा जणांचा कोरोना अहवाल पाँझिटिव्ह आला आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी ही माहिती दिली. यवत व स्वामी चिंचोली येथील कोवीड सेंटर मध्ये काल कोरोना बाधीतांच्या संपर्कातील ९९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. ८९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, मात्र केडगाव येथे दोन, भांडगाव येथे दोन, देलवडी येथे दोन, पिंपळगाव येथे तीन व पाटस येथे एका महिला असे एकूण दहा जणांचा कोरोना अहवाल पाँझिटिव्ह आला. हे सर्व जण कोरोना बाधीतांच्या संपर्कातील आहेत.
पाटस मध्ये आज हनुमान मंदिर परिसरात रहिवासी असलेल्या एक महिला कोरोना बाधीत आढळली आहे, दरम्यान काल दिवसभरात शहरासह तालुक्यात केवळ चार रूग्ण सापडले होते, मात्र आज तालुक्याच्या ग्रामीण भागात दहा नवे रूग्ण सापडले असल्याने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे चित्र आहे.










