इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूरमध्ये आज कोरोनाचे तीन नवीन रुग्ण आढळले आहेत. इंदापूर शहरातील शेख मोहल्ला आणि लुमेवाडी येथील हे रुग्ण आहेत. तर तब्बल १९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
इंदापूरमध्ये काल २२ जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये इंदापूर शहरातील शेख मोहल्ला आणि लुमेवाडी येथील रुग्णांचा समावेश आहे. दुसरीकडे १९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यामध्ये तालुक्यातील काझड आणि निंबोडी येथील संशयितांचा समावेश आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.










